Posts

Showing posts from January, 2020

येसगी ते गंजगाव जिल्हा मार्ग 41 चे डांबरीकरण करण्याची बांधकाम मंञी अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली मागणी बिलोली (प्रतिनिधी)

बिलोली  (प्रतिनिधी) बिलोली तालुक्यातील मौजे येसगी ते गंजगाव ह्या 6 कि.मी रस्ताची अवस्था वाईट आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळुन 72 वर्षाचा काळ लोटला असुन एकीकडे जग चंद्रावर जात आहे पण स्वातंत्र्य पासुन शासन आणि प्रशासन गंजगाव ग्रामस्थाना साध्या चिखलातुन वर काठण्यास तयार नाही येसगी ते गंजगाव रस्ता हा जिल्हा मार्ग 41 चा प्रमुख रस्ता आसुन ह्या रस्तावर वाहानाची नेहमीच वर्दळ आसते.कार्ला ते गंजगाव रस्तावर मध्यभागी भयानक नाला आहे नाल्यावर सतत पाणीसाठा जमा होत आसल्यामुळे पाऊसाळ्यच्या दिवसात पाऊस झाला तर चार ते पाच दिवस तालुक्याशी संपर्क होत नाही विधानसभा मतदानावर गंजगाव ग्रामस्थाचा बहिष्कार होता परंतु प्रशासनाच्या मद्यस्थितीने व अश्वासनाने बहिष्कार माघार घेण्यात आला विधानसभा मतदान होवुन तिन महिन्याचा कालावधी लोटला पण आजुन रस्ता व पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही मागिल 25-30 वर्षापासुन येथिल जनतेच्या समस्याचा शासनाकडुन निपटारा होवु शकला नाही गावातुन मुख्य रस्ताला जोडता येईल आसा कुठलाच रस्ता शासनाकडुन केला नाही दरवर्षी पाऊसाळ्यात कार्ला ते गंजगाव दरम्यान आसणार्या आणि अतिशय जिर्ण झालेल्या...

सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
मुखेड प्रतिनिधी :-  भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले  त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप उफळून आल्याचे दिसून ...

मुखेड कार्यक्षेत्रात 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह साजरा. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे सडक सुरक्षा - जीवन रक्षा 31 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 च्या अनुषंगाने रस्ते हे समाजाच्या रक्त वाहिन्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड च्या वतीने मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी पणे राबविण्यात आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अविनाश धोंडगे यांच्या मार्गद्शनाखाली व कार्यकारी अभियंता श्री सुधीर नाईक यांच्या सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रात रस्ता सुरक्षा सप्ताह मोहीम 2020 ही प्रभावीपणे राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड कार्यक्षेत्रातील राज्य रस्ते व इतर मार्गावर प्रवाशांसाठी व वाहन चालकांसाठी विविध बोधपृद बॅनर, होरडिंग्ज, सूचना  फलक, माहिती पुस्तिका,वाहन चालकांची प्रतिज्ञा चे होरडिंग्ज इत्यादी लावण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुखेड चे उप अभियंता श्री ओमप्रकाश बेंबरे, शाखा अभियंता श्री पांपटवार, नीलकंठवार,श्री.शेंबाळे, श्री.उत्तम कुलकर्णी, श्री रवि, सखाराम कागणे, हुसैन शाहजौर, गोविंद राठोड,

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.

मुखेड  प्रतिनिधी :-  (भारत सोनकांबळे) मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.14 जानेवारी 2020 रोजी येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात  विश्वशातींचे उद्गाते, आणि कासल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्व वंदनीय महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ला मिळावे म्हणून 14 जानेवारी 1994 मध्ये ज्या महान शहीद हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्यामध्ये प्रामुख्याने टेभूर्णी येथील शहीद पोचिराम कांबळे,जनार्दन मवाडे, नांदेड येथील गौतम वाघमारे, चंदर कांबळे या सह अनेक शूरवीर या नामांतर लढ्यात शहीद झाले त्या सर्व शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्य...