Posts

Showing posts from April 2, 2020

युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने  ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप . कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे नायगाव तालुक्यातील देगाव येथील गोर गरीब शेतमजूरी करणार्‍यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले असून अशरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत  त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टी युवा नेते राहुल दादा गायकवाड यांच्या वतीने तालुक्यातील मौजे देगाव येथील गरजूंना  अन्न धान्याची  मदत करण्यात आली.या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष,मंगेश गायकवाड, सचिन, राजू    सर्व मित्र परिवार व कार्यकरते उपस्थित होते...

जिल्ह्यात उज्वला योजनेतील २ लाख लाभार्थ्यांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर

Image
लॉकडाऊन काळात उज्वला योजनेंतर्गत जोडण्या घेतलेल्या लाभार्थ्यांना दिलासा - नितीन आमले नांदेड प्रतिनिधी/ वैभव घाटे कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान उज्वला योजनेंतर्गत गॅस घेतलेल्या ग्राहकांना भारत सरकारने माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत गॅस रिफिल देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दोन लाख उज्वला योजनेंतर्गत जोडणी घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना मोफत गॅस पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नांदेड जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियमचे नांदेड जिल्हा सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली आहे.देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा गॅस मोफत मिळा...