बेरोजगार दिव्यांगांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी देत राजपत्रित अधिसुचना पत्राचे दहन करून केले पंतप्रधानांना निवेदन सादर.
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सरकारी नौकरीमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि या संदर्भातील राजपत्रीत अधिसूचना हि नुकतीच जारी केली असुन यानुसार आता दिव्यांगांना आयपीएस, पोलिस दल, रेल्वे संरक्षण दल यासारख्या सरकारी सेवांमधील नियुक्त्यामध्ये चार टक्के मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले आहे आणि हा जाचक जुलमी निर्णय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील दिव्यांगांवर घोर अन्याय करणारा आहे आणि भविष्यात या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सर्व घटक राज्ये हि असेच निर्णय घेऊन दिव्यांगांना हक्काच्या चार टक्के आरक्षणापासुन दुर ठेऊ शकतात आणि भविष्यात दिव्यांगांना शासकीय नौकरी असो वा निमशासकीय नौकरी असो ती मिळणारच नाही त्यामुळे असा प्रकार भविष्यात घडु नये यासाठीच आज दि 23 आँगस्ट 2021 रोजी कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड यांच्याकडुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल साळवे यांच्या नेतृत्वात राजपत्रित अधिसुचना पत...