बिलोली येथील रक्तदान शिबिरात 66 जणांनी केले रक्तदान
बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे) शहरातीलच पंचायत समिती येथे यूद्ध कोरोणाशी ग्रुप बिलोली व तालूका प्रशासन यांच्या संयूक्त विद्यमानाने जीवन आधार रक्तपेढी नांदेड मार्फत रक्तदान शिबिर दि 4 एप्रिल रोजी संपन्न झाले असून 66 रक्तदात्यानी रक्तादान केले. भारतात कोरोना विषाणू ने भारतात घातलेला थैमान लक्षात घेऊन भारत सरकारने केलेल्या आव्हानाला स्विकारुन कोरोना ग्रस्थांना रक्ताचा पुरवटा करण्यासाठी युद्ध कोरोनाशी ग्रुप व बिलोली तालूका प्रशासन कडून अव्हान करण्यात आले होते. शिबिरात शहर व तालूक्यातील गणेश मंडळाचे सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी ,सह महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणचे सगरोळी येथील मारोती पा.कुरुडगे यांच्या कुटुंबातील 12 सदस्य व श्रुती एच पि गँसचे कर्मचारी सह अनेकजन सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी बिलोली प्रशासनाचे तहसिलदार विक्रम राजपुत व नायब तहसिलदार ओम प्रकाश गोंड ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नायक ,यूद्ध कोरोनाचे प्रमुख इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदि...