Posts

Showing posts from January 14, 2020

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.

मुखेड  प्रतिनिधी :-  (भारत सोनकांबळे) मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.14 जानेवारी 2020 रोजी येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने व पत्रकार भारत सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात  विश्वशातींचे उद्गाते, आणि कासल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्व वंदनीय महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ला मिळावे म्हणून 14 जानेवारी 1994 मध्ये ज्या महान शहीद हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, त्यामध्ये प्रामुख्याने टेभूर्णी येथील शहीद पोचिराम कांबळे,जनार्दन मवाडे, नांदेड येथील गौतम वाघमारे, चंदर कांबळे या सह अनेक शूरवीर या नामांतर लढ्यात शहीद झाले त्या सर्व शहीदांना विनम्र आदरांजली वाहण्य...