Posts

Showing posts from March 17, 2020

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

Image
सामाजिक उपक्रमातून साजरे करावेत जन्मदिवस -       डॉ.राहुल कांबळे मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील होडगीड वाडी दारू तांडा सोनपेठ वाडी फतु तांडा येथील पशुपालकां साठी गोवर्धन गो सेवा केंद्र परिसरात भव्य पशुरोग निदान शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला डॉक्टर राहुल कांबळे येवतीकर यांच्या आपला जन्म दिवस त्यानिमित्त आयोजित करण्यात आले सकाळपासून गेचुड फवारणी जंतनाशक गर्भ तपासणी शंभर जनावरावर मोफत विलाज करण्यात आलेला आहे. तर धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील आरोग्य विभागाचे उपकेंद्र वर कार्यरीत असलेल्या डॉ.राहुल कांबळे यांच्या सौभाग्यवती आरोग्य सेविका सौ.सोनाली वाघमारे यांनी आपल्या उपकेंद्रावर गरोदर मातास पोष्टीक आहार देऊन आपल्या कार्यसम्राट समाज सुधारक पतीला सामाजिक उपक्रमातून  दिलेल्या शुभेच्छा. मुखेड तालुक्यातील डॉक्टर राहुल कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते पण त्यांच्या समाजातील  दि.15 /03/2020 रोजी परिवारातील सदस्य मुखेड न्यायालयाती वकील गोरोबा कांबळे यांचा अपघाती न...

*बेटमोगरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला* ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

Image
तालुक्यातील बेटमोगरा येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की,बेटमोगरा हे गाव मोठी बाजारपेठ असल्याने येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेत  शेतकऱ्यांसाठी पीक विमा व दुष्काळी मदतीसाठी परिसरातील पंधरा ते वीस गांवाच्या कारभार होत होता.परंतु ह्या बँकेत दि.१६ मार्च रोजी मध्य रात्री चोरट्यांनी बँक फोडून तेथील तिजोरी उचलून व गावातीलच अॅटो क्रं.एम.एच.२६ ए.सी.४७०६ हा अॅटो चोरुन तिजोरी घेऊन गावातील मन्याड नदी काठी जावून लॉक तोडण्याचा प्रयत्न केला पण तिजोरी वजनदार असल्याने फुटली नाही, शेवटी चोरट्यांनी तिजोरी व अॅटो सोडून पसार झाले.हा प्रकार सकाळी गावातील नागरिकांना समजताच त्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापक, मुखेड व देगलूर पोलिस ठाण्यात कळवली असता पोलिस उपअधीक्षक देगलूर रमेश सरवदे व मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर येऊन सदरिल घटनेची चौकशी व पंचनामा केला असता चोरट्यांना तिजोरी फुटली नसल्यामुळे तिजोरीतील ४ लाख ९२ हजार ५५२ रुपये सुरक्षित असल्याचे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी सां...