Posts

Showing posts from August, 2019

महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)

Image
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला  अलमट्टी धरणच जबाबदार आहे. पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर  महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला... आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुर...

बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,  या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.       यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे  यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान  कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व...

संगणक परीचालकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न

Image
बिलोली प्रतिनिधी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बिलोली च्या वतीने दि 28 ऑगस्ट रोजी आपल्या विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.     शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. संगणक परिचालक हे सर्व कामे तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत  हे मानधन पण वेळेवर होत नाही.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने खालील मागण्या घेऊन आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी,  पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आय टी महामंडळाकडू नियुक्ती द्यावी, संगणक परीचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातु न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना किमान 15000 हजार वेतन द्यावे इत्यादी प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ...

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यात  पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री करत अक्षरश: कहर केला आहे.  धुवाँधार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने गंजगाव माचनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  संततधार पावसामुळे कार्ला ते गंजगाव रस्तामध्ये   नाल्यावर  रात्रीपासून पाण्याखाली गेला. त्यामुळे गावांचा बिलोली तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जावून दोन तिन दिवस  पाण्याखाली राहतो.गावचे सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यांनी  या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली असली तरी याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे .