महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)












कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला  अलमट्टी धरणच जबाबदार आहे.

पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर  महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन
छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला...
आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुरात महाप्रलयकरी महापूर कोल्हापुरात आला आणि संपूर्ण शहराला बारा दिवस पुराच्या पाण्याने वेढले आणि यामुळे हजारो संसार उद्धवस्त झाले..
 महापुराला पुररेषेजवळील बांधकामेच फक्त जबाबदार आहेत असाच फक्त तर्क लावणे चुकीचे ठरेल.. मुळातच अलमट्टी  धरणातून ज्यापद्धतीने पाण्याचा विसर्ग होणे आवश्य आहे तो विसर्ग शेवटपर्यंत झालाच नाही.. त्याचप्रमाणे धरणाची वाढवलेली उंचीही तितकीच कारणीभूत आहे. निव्वळ पुररेषा आखून पुराचा प्रश्न सुटणार नाही.. तर राज्य शासनाने केंद्रसरकारच्या माध्यमातून कर्नाटक सरकारवर दबाव आणून अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत धोरणात्मक ठोस निर्णय घेण्याची गरज आहे..*
*त्यांनतर ज्येष्ठ पत्रकार माजी कार्यकारी अभियंता नाथजीराव पोवार यांनी २६ धरणावर काम केले आहे. अलमट्टी धरण हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे..
 *यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज आहे यासाठी महाराष्ट्र शासनाला आवश्यक असलेला अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्याची जबाबदारी स्वतः घेऊ असं मनोगत त्यांनी व्यक्त केले...

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फिरोज खान म्हणाले केवळ अलमट्टीच नाही, तर हिप्परगी धरणाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाते.. राजापूर बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटकातील पहिले धरण हिप्परगीचे लागते या धरणातूनही पाण्याचा योग्य विसर्ग होत नाही त्यामुळे अलमट्टीबरोबरच हिप्परगी धरणाबाबत चर्चा होणे गरजेचं आहे..

संभाजीराव जगदाळे म्हणाले की कर्नाटक सरकार नेहमीच महाराष्ट्राबाबत आडमुठेपणाचे धोरण अवलंबवते... अलमट्टी धरणामुळे २००५ साली पुराचे पाणी कोल्हापूर व सांगली शहरात शिरले होते.. यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते.. त्याप्रमाणे दररोज ५ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करत असल्याचे कर्नाटक सरकार सांगत होते पण प्रत्यक्षात ते तसं करत नव्हते.. पाण्याचा साठा करून आपल्या भागातील शेती सुजलाम सुफलाम करून कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे..

त्यानंतर नरेंद्र मोदी विचार मंचचे जिल्हाप्रमुख सुनील सामंत यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने कोल्हापूरकरांनी उभी केलेली ही जनचळवळवळ असून ह्या आंदोलनाचा धारदार आणि तितकाच दमदार आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्याची धमक कोल्हापूरकरांकडे चांगलीच आहे.. या चळवळीत प्रामुख्याने सळसळत्या रक्ताच्या अभ्यासू नवतरुणांचा सहभाग अत्यावश्यक आहे... कोल्हापूरचा मक्ता जणूकाही आपणच घेतलाय अशा अविर्भावात नेहमीच स्टंटबाजी करणाऱ्या त्याच त्याच चेहऱ्यानी या कोल्हापूरची पूर्ती वाट लावली आहे त्यामुळे नवीन तडफदार आणि अभ्यासू तरुणवर्ग या चळवळीत सहभागी व्हावा आणि ही चळवळ संपूर्ण देशासाठी आदर्शवत ठरावी.. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचं अनुकरण करणारा एकही नेता आजवर कोल्हापूरला लाभला नाही... या महापुराने मात्र कोल्हापुरातील काही जातीयवादी नेत्यांमुळे जी जातीयता पसरली होती ती सर्व कटुता या महापुरात वाहून गेली आणि प्रत्येक जातीपातीच्या लोकांनी एकसंघ होऊन एकमेकांना धीर आणि मदतरुपी सहकार्य करून आदर्शवत असं कोल्हापूर जे खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत आहे ते कोल्हापूर अनुभवायला मिळालं... आणि एक आदर्शवत अशा माणुसकीचा अनुभव कोल्हापूरकरांनी अनुभवला.. असंच एकसंघ होऊन हे महाआंदोलन यशस्वी करूया..
यानंतर बाबा महाडिक, बाबा पार्टे, राजू जाधव, संपतराव चव्हाण, अमोल कुरणे, किशोर घाटगे, अवधूत भाट्ये आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.. या बैठकीत प्रदीप शेलार, शिवाजीराव लोंढे, सुनील पाटील,  शरद नारकर, राजेंद्र थोरवडे, राजू मांडवकर व आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते...सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. प्रकाश सरनाईक यांनी केले

Comments