Posts

Showing posts from December 28, 2021
Image
 प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या हस्ते सगरोळी येथे शिवा संघटनेच्या शाखेची पुनररचना करून फलकाच अनावरन                 वैभव घाटे       नांदेड- जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील  सगरोळी या गावातील *शिवा संघटनेच्या शाखा पुनररचना करुन नव तरूणांना संधी देत* नुतन कार्यकारिणी ची निवड करून *शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे सर यांच्या शुभहस्ते शाखांच अनावरन* मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले.  *"शिवा संपर्क अभियान"* अंतर्गत शिवा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यभर शिवा संघटनेच्या 3000/ शाखांची पुनररचना करण्याचे *आदरणीय प्रा.मनोहरराव धोंडे सर* यांनी जाहीर केल्यानंतर प्रत्येक गावागावात शिवा संघटनेच्या शाखा पुनरगठीत करत युवा वर्गाला प्राधान्य देत एक नवचैतन्य निर्माण होताना दिसते आहे. याच धर्तीवर *बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे शिवा संघटनेच्या फलकाच अनावरन अत्यंत जल्लोषात जय शिवा च्या गजरात मोठ्या उत्साहाने झाले.*      यावेळी *शिवा संघटनेचे जिल्हा...
Image
  घुंगराळा येथे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र शिबीराचे आयोजन                 माधव पवार   नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आल्याची माहिती सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी दिली असून या कार्यक्रमात भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र व शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यानी मोठया संख्येने या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे   तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या कृषिरत्न हायटेक नर...
Image
विधानसभेच्या अधिवेशनात आठ आमदारानी तारांकित प्रश्न मांडल्यामुळे कारवाईच्या भितीने व्यंकेज इंडिया कंपनी बंद  नागरिकाचे आरोग्य धोक्यात ठेवून ? चालवित होते कंपनी                माधव पवार नायागांव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्यंकेज इंडिया कंपनी कडून अनेक वर्षा पासून विषारी द्रव्य व घाण पाणी सोडण्यात येत असल्या बाबत विधानसभेच्या आधिवेनात तांराकीत प्रश्न आठ आमदारांनी उपस्थित केल्यामुळे यावर प्रधान सचिवांनी आरोग्य विभागाला खूलासा मागविला होता. त्यावर आरोग्य विभागाणे कृष्णूर परिसरातील जल जनय आजारामूळे कोणताही साथीचा उद्रेक झाला नसल्याचा अजब खूलासा दिल्याने खळबळ उडाली होती परंतु कंपनीवर कारवाई होईल या भीतीमुळे व्यंकेजच्या व्यवस्था पकाने कंपनीच गेल्या सात ते आठ दिवसा पासून बंद करून ठेवल्यामुळे काही तरी काळेबेरे उघड होण्याची शक्यता नाकरता येत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे         नायगाव तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत चालणारी ही व्यंकेज इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकाने कोरोना महामारीच्या काळात शासन...