घुंगराळा येथे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र शिबीराचे आयोजन 

             माधव पवार 

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आल्याची माहिती सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी दिली असून या कार्यक्रमात भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र व शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यानी मोठया संख्येने या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे  तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या कृषिरत्न हायटेक नर्सरी या ठिकाणी भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चर्चासत्र व मार्गदर्शन शिबीराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी दिली असल्यामुळे शेतकरी बांधवानी कार्यक्रमाला यावेत असे ही कळविण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सौ.वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे   घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर हे राहणार असून या कार्यक्रमात नन्हेमस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचे  विष्णू घोडके, ईलाईट सीड्स या कंपनीचे संजय गणफाडे हे कृषीतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये फळ, भाजीपाला यांची लागवड, उत्पादन, उत्पादनात वाढ ,पिकांची निगा कशी राखायची यावर मार्गदर्शन करण्यात येणार असून या सदरच्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह कृषीरत्न हायटेक नर्सरीचे संचालक शितल पाटील यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला