राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्याक्षासह नायगाव तालुका अध्यक्षात ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता...?
माधव पवार
पक्षा पक्षातले राजकारण म्हटल्याच्या नंतर अतिशय टोकाला जाऊन राजकारण केल्या जाते परंतु एकाच पक्षातील राजकीय पुढारी एकमेकांशी संगणमत करून राहण्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ही नेते मंडळीत आता राजकारण झडू लागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरीहरराव भोसीकर कर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्याक्ष भास्कराव भिलंवडे यांच्यात पक्षा अंतर्गत ताळमेळ लागत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शकता असल्याचे चित्र ग्रामीण भागातुन दिसून येत असले तरी गेल्या दोन ते तीन वर्षाखाली पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणाऱ्या भिलंवडेना एका कार्यक्रमातुन नाव वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट नाराज असला तरी ते गटबाजी कुठे तरी थांबली पाहिजे असे कार्यकर्त्यातुन बोलल्या जात आहे नायगाव मतदार संघातील काही दिग्ज नेते मंडळी काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेल्या दोन तीन वर्षाखाली भाजपा पक्षात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठया प्रमाणात गळती लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसची घडयाळ बाजूला सोडून भाजपा पक्षात प्रवेश केला होता व कमळ हातात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष भास्कराव भिलंवडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची घड्याळ बंद ऐवजी चालूच ठेवली होती जिल्ह्याचे राजकारण आणि नायगाव तालुक्याच्या राजकारणात बराच फरक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरिहरराव भोसीकर व भास्कर भिलंवडे यांच्यात कशामुळे समन्वय राहिले नाही हा चिंतेच विषय असल्यामुळे भाजपा सारखी राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकरता येत नसल्यामुळे नायागांव तालुक्यातील गटातटाचे राजकारण होताना पाहवयास मिळत असले तरी राष्ट्रवादी पक्ष मजबूत व टिकून ठेवण्यासाठी भास्कराव भिलंवडे यांचं योगदान असल्याचे ही नायागांव तालुक्याच्या जनतेतुन बोलल्या जात असून राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमाला तालुकाध्यक्षाला डावलून धडक कार्यक्रम घेतले जात असताना दिसून येत असले तरी घुंगराळ्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस वसंत पाटील सुगावे यांचा ही राष्ट्रवादी पक्ष टिकून ठेवण्यासाठी अफाट प्रयत्न केले आहे
Comments
Post a Comment