दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामुळे भाजपा सरकारला शेतकऱ्यापुढे अखेर नमावे लागले  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचे घुंगराळ्याच्या कार्यक्रमात प्रतिपादन 

माधव पवार
नायगाव
 तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे देशाचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्याच्या चर्चासत्राच्या शिबीरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसिकर म्हणाले की दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनातील शेतकऱ्यांपुढे आखिर नमावे लागले असल्याचे मत घुंगराळ्यांच्या  कार्यक्रमात व्यक्त केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथे 
 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे  शेतकऱ्यासाठी भाजीपाला व फळ उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शेतकऱ्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव  भोसीकर  म्हणाले की शरद पवार हे गेल्या पन्नास वर्षापासून राजकारणा बरोबर समाजकारण हि करत असल्यामुळे गेल्या दहा वर्षाखालील कृषी मंत्री असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकऱ्यांचे ८० हजार कोटीचे कर्ज माफ केले जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना एकूण ३५० कोटी रुपयाचे कर्ज माफ करण्यात आल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन वर्षांखाली शेतकरी कायदा केला होता परंतु हा कायदा केला ते कायदा काय भांडलदाराच्या हाती जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती परंतु अखेर कायदा मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजपा सरकार भाग पाडले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे योगदान असल्यामुळे देशाच्या पंतप्रधानाना शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे नमावे लागले असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले याच कार्यक्रमात पुढे बोलताना भोसीकर म्हणाले की आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्यामुळे या विभागाचा कोणता लोकप्रतिनिधी करतो या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस वसंत पाटील सुगावे यांचा शेतकऱ्यांनी विचार करावा असे ही ते म्हणाले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्याक्ष हरिहरराव भोसेकर,विष्णू घोडके,शीतल पाटील. संचालक कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,डी बी जांभरुणकर, सौ प्रांजली रावणगावकर  संतोष दगडगावकर,आर एस पाटील जाधव, लक्ष्मण पाटील जाधव,श्रीकांत मांजरमकर, निलेश देशमुख रुईकर विश्वनाथ बडूरे,शिवाजी पाटील जाधव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर. वैजनाथ कमठेवाड माजी मुख्याध्यापक व्ही के कागडे, एकनाथ वाघमारे,अमोल सातेगावकर, व्यंकट शिंदे, पत्रकार केरबा रावते,व्यासपीठावर उपस्थित होते 

    गावातील प्रतिष्ठीत नागरिक नागोराव दंडेवाड, बालाजी मातावाड, बालाजी हाळदेवाड, शिवाजी पाटील ढगे, शाम सुंदर पाटील, नारायण पाटील ढगे, माधव पाटील ढगे, किशन पाटील सुगावे, शाम यम्मलवाड, शेषराव पाटील ढगे, व्यंकटराव कंचलवाड,संभाजी तुरटवाड, मारोती कंचलवाड, गंगाधर बोधनकर, राजेश ढगे, योगेश ढगे,चंद्रप्रकाश ढगे, एस के गजभारे, प्रल्हाद बोधनकर, गंगाधर सूर्यवंशी,संजय गजभारे, किशन दंडेवाड, विलास पाटील ढगे, विशाल पाटील जाधव,राम पाटील सुगावे,शिवानंद पाटील ढगे, संभाजी सूर्यवंशी, विलास यमलवाड, बालाजी पाटील ढगे, खंडेश्वर पाटील ढगे, साईनाथ ढगे,अरुण सूर्यवंशी, सिद्धोन पटेकर, राजेश सूर्यवंशी, कैलास यमलवाड, सुग्रीव गजभारे, आदी सह यावेळी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला