महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला अलमट्टी धरणच जबाबदार आहे. पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला... आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुर...