Posts

Showing posts from October, 2021

केंद्रीय अर्थराज्य मंञी भागवत कराड साहेबांचे बोळेगाव येथे जंगी स्वागत

Image
बिलोली/नागेश इबितवार भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थराज्य मंञी हे देगलूर/ बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आनुषंगाने सगरोळी दौऱ्यावर आले असता बोळेगाव येथे ग्रा.पं.सदस्य विठ्ठल तुकडेकर यांनी जंगी स्वागत केले यावेळी भाजपा संघटन मंञी संजय भाऊ कौडगे,जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब  ज्ञानेश्वर करडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

इंडियन पँथर सेनेच्या पाठपुराव्याला यश!

  नांदेड प्रतिनिधी- घाटे वैभव        नांदेड जिल्ह्यातील बिलोली हा सर्वात जुना व मोठा तालुका असून स्वातंत्र्याच्या ७४ वर्षात अग्निशमन बंब खरेदी करता आले नव्हते परिणामी बिलोली व परिसरात अनेक आगीच्या घटना घडल्या अनेकांची घरे,दुकाने इतकेच नाही तर अग्निशमन बंब च्या अभावी आगीमुळे शेतकऱ्यांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.या सामाजीक प्रश्नांची जाण असणाऱ्या इंडियन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांनी ४-५ वर्षांपासून सतत शासनदरबारी पाठपुरावा करून बिलोली नगर परिषदेच्या गाळा लिलावातून मिळालेल्या रकमेतून किंवा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)यातून बिलोलीसाठी कायमस्वरूपी अग्निशमन बंब ची मागणी करून वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ही मार्ग अवलंबविला होता.याचीच फलनिष्पत्ती म्हणून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)२०२१ अंतर्गत बिलोली नगर परिषदेसाठी नवीन अग्निशमन बंब खरेदी करून उपलब्ध करून देण्यात आले आहे.              या पूर्वी बिलोली व परिसरात ...

सामाजिकदृष्ट्या वंचित असलेला धोबी समाज! राजकीय दृष्ट्याही अजून वंचितच का!--डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र-

Image
बिलोली/नागेश इबितवार सर्व डेबूजी युथ ब्रिगेडच्या शिलेदारांना आव्हान करण्यात येते की! कोणत्याही पक्षाच्या मागे जाऊ नये. समाजाचा फक्त वापर करत आहेत. राज्यकर्त्यांनी परिट धोबी समाजाला गृहीत धरू नये.राज्यकर्त्यांनो आमचा विचार करा.अन्यथा आम्हाला तुमचा विचार करावा लागेल. आमचा विरोध आम्ही मत पत्रिकेतून दाखवून देऊ आपल्या बिलोली देगलूर मतदारसंघात विविध धार्मिक सामाजिक नेत्यांचे अनेक पुतळे आणि माहामानवांच्या नावाने मार्ग आहेत पण ज्या महाराष्ट्राला आपल्या कीर्तनातून आणि कृतीतून जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे व अहोरात्र समाजासाठी झटले , स्वताच्या संसराचा सुद्धा त्याग केला.आशा संतांचा सन्मान करुन गौरव केला पाहिजे.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा नांदेड शहरात व जिल्ह्यात अजूनही एकही पुतळा नाही मग राष्ट्रसंत गाडगे बाबा फक्त तुम्हाला निवडणुकीपुरतेच आठवतात का! परीट/धोबी समाजाचा युवक आता जागृत झालेला आहे त्यांना स्वतःच्या विचारांची जाण आहे.तो समाज सुद्धा राजकिय द्रष्ट्या सक्षमआहे. जो आमचा विचार करणार नाही! त्याचा आम्ही पण विचार करणार नाही!आता आमचा निर्धार पक्का जो करेल धोबी समाजाचा विचार त्यालाच मारू शिक्का.?द...