नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला




बिलोली प्रतिनिधी 


बिलोली तालुक्यात  पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री करत अक्षरश: कहर केला आहे.  धुवाँधार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने गंजगाव माचनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

संततधार पावसामुळे कार्ला ते गंजगाव रस्तामध्ये   नाल्यावर  रात्रीपासून पाण्याखाली गेला. त्यामुळे गावांचा बिलोली तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जावून दोन तिन दिवस  पाण्याखाली राहतो.गावचे सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यांनी  या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली असली तरी याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे .

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस