घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -








 रुई वार्ताहर माधव पवार 

नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे आयोजित केलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह सरपंच व उपसरपंच यांची अतिशय महत्वाची उपस्थिती मानली जाते परंतु प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला प्रशासना कडून सरपंचाला सूचनाच मिळाली ? नसल्याने घुंगराळा नगरीच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवर ह्या सदरच्या कार्यक्रमा पासून वंचित राहिल्यामुळे सरपंच बाईने नाराजी व्यक्त केली असल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे ताक्यातील मौजे घुंगराळा येथे जिल्हा परिषद हायस्कूल तेथे विविध क्षेत्राच्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती परंतु घुंगराळ्याच्या महिला सरपंच श्रीमती जोगेवार यांना सदरच्या प्रशासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात करण्यात आल्यावर ही बोलावले नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महोन जोगेवार यांनी सांगितले असले तरी मंडळधिकारी कळकेकर यांनी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी फोन करून सांगितले  असल्याचा आरोप सरपंच प्रतिनिधीने केला असला तरी महिला सरपंच कार्यक्रमाला का ? गेले नाहीत असा ही प्रश्न नागरिकांत उपस्थित होत  आहे गावांत कोणताही कार्यक्रम आयोजित केल्याच्या नंतर प्रथम सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,पोलीस पाटील,महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष,तसेच माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य,यांना सन्मान दिला जातो परंतु सरपंचाला सुचनाच प्रशासनातील अधिकाऱ्यानी  दिली नसल्याने सदरच्या कार्यक्रमाला जावू शकल्या नाहीत असे ही महोन जोगेवार यांनी सांगितले परंतु अधिकाऱ्यानी प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सरपंचाना बोलावले होते पण त्यांनी नाही म्हणून सांगतात तर सरपंच म्हणतात मला बोलावलेच नाही म्हणून महिला सरपंच सांगत आहेत घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कूल आयोजित केलेल्या प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाला नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे, नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी फांजेवाड, नायगाव कृषी विभागाचे कृषी अधिकारी, कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नायगावचे एकात्मिक बाल विकास अधिकारी, मंडळ अधिकारी कळकेकर, रुई बुद्रुक तलाठी सजाचे तलाठी, देगाव तलाटी सजाचे तलाठी, कृष्णुर तलाठी सज्जाचे तलाठी,आदी यावेळी उपस्थित राहून सरपंचाना योग्य वेळी बोलावून घेतले नसल्यामुळे महिला सरपंचानी खरी तरी नाराजी व्यक्त केली आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला