माजी मंत्र्याचे जावाई आंबादासराव धर्माधिकाऱ्याची आघामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी बरबडा गटात हालचाली सुरु



 नायगाव / रुई - माधव  पवार 

राजकीय वर्तुळात राजकीय वादळ उठवणारे माजी मंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे बरबडा येथील रहिवासी असलेले जावाई अंबादासराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरबडा जिल्हा परिषद गटात मोर्चे बांधण्यासाठी हालचाली चालू केले असल्याचे पाहावयास मिळत असून बरबडा जि.प गटात सोयऱ्या धायऱ्याचे राजकारण होणार की काय याकडे निवडणुकी पूर्वीच अनेकांचे लक्ष लागले आहे नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील रहिवासी असलेले माजी मंत्री खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव राजेश देशमुख कुंटूरकर हे सध्या भाजपा पक्षात असल्यामुळे बरबड्याचे अंबादासराव धर्माधिकारी हे राजेश कुंटूरकर यांचे मेहुणे असल्यामुळे भाजपा पक्षा कडूनच मोर्चे बांधणीच्या हालचाली चालू केल्या आहेत की असा प्रश्न जनतेला पडला असला तरी राज्यातल्या राजकारणापेक्षा जिल्ह्याचे राजकारण वेगळे तर जिल्ह्याच्य राजकारणापेक्षा ग्रामीण भागातील राजकारण हे टोकाला जाऊन केल्या जाते हे मात्र वास्तव चित्र अनेकवेळा स्पष्ट दिसून येते राजकारण म्हटले की कोण कोणत्या पक्षात प्रवेश करील यांचा अंदाज नसतो राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लाडके मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपा पक्षात प्रवेश करून भाजपचे नेतृत्व केले होते व भाजपाला रामराम करून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केले हा झाला राजकारणाचा खेळ तशाच पद्धतीने नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील आंबादासराव धर्माधिकारी हे कुंटूरकराचे जावई असल्यामुळे हे भाजपा पक्षाची की काँग्रेस पक्षाचे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याचे अजून ही स्पष्ट केले नसल्यामुळे  राजकारणात भविष्यातील रंगावर रंग चढला जाणार आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणीच्या हालचाली चालू असल्याचे मात्र स्पष्ट दिसून येत असले तरी आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर हे अधिकृत भाजपा पक्षात प्रवेश केले नसल्याचे सांगितले असल्यामुळे मग.. का काँग्रेस पक्षांचे कीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ? असा प्रश्न निर्माण झाला असला तरी माजी मंत्र्याच्या जावयाची आघामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चे बांधणीची हालचाल सुरु झाल्याचे दिसून येत असून जर बरबडा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषासाठी सुटले तर सदरच्या गटातील निवडणूक नक्की लढवू असे ही सांगितले आहे

Comments

Popular posts from this blog

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.