बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटुर पोलीसाच्या धाडीत विस हजाराची देशी दारू जप्त अन.. दारूबंदी अधिकाऱ्यांना लागली मालिद्याची आस..आणि गोरगरिबांच्या संसाराची लागली वाट

 

नायगाव / रुई  माधव पवार 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे पाटोदा (त ब ) शिवारातील टाळक्याच्या पिकात बरबडा येथील रहिवासी असलेले एक इसमानी देशी दारूचे सात बॉक्स लपवून ठेवून चोरट्या मार्गाने विक्री करण्याचा अशे पोटी लपून ठेवले होते परंतु सहाय्यक पोलिस अधिक्षक बिलोलीचे अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून फौजदार दिनेश येवलेसह फौजदार संजय अटकोरे यांच्या टीमने बरबड्याच्या एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन सात अवैध देशी दारूचे बॉक्स जप्त केले असताना सुद्धा बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्याचा मालिद्यात जिव गुंतला असल्यामुळे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गासह जनतेतुन संताप व्यक्त केला जात असला तरी गोरगरीबाच्या संसाराची चांगली वाट लागली आहे 


तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्यात हद्दीत असलेल्या बरबडा गावात गेल्या एक ते दोन महिन्या खाली बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या टीमने अवैध देशी दारूचे २७ बॉक्स पकडून कारवाई केली असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याच्या उरात चांगली धडकी भरली होती कांही दिवसाच्या कालावधी नंतर पाटोदा शिवारातुन कुंटूर पोलिसांनी एकूण सात देशी दारूचे बॉक्स जप्त केले असून आरोपीला ही ताब्यात घेतले असल्याची माहिती सपोनि महादेव पुरी यांनी दिली असले तरी बिलोलीचे दारूबंदी अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन मालिद्यात मग्न असल्याचा संतापजनक सवाल जनतेस महिला वर्गानी केला असून दारुबंदी अधिकाऱ्यांना लागली मालिद्याची आस..अन..देशी दारू मुळे गोरगरिबांच्या संसाराची चांगलीच वाट असे ही महिला वर्गातुन बोलल्या जात आहे बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि  महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले, यांच्यासह फौजदार संजय आटकोरे, व त्यांच्या पोलीस टीम मधील पोहेका निखाते, पोहेका लक्ष्मण सोनकांबळे,पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार, पोलिस नाईक कंधारे, यांनी देशी दारूचे सात बॉक्स टाळक्याच्या पिकातून जप्त केले सदरच्या सात बॉक्स देशी दारुची अंदाजे किमत वीस हजार रुपये एवढी असून अवैध देशी दारू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देश होता परंतु ह्या सात बॉक्सचा मालक कोण ? असा प्रश्न पोलिसांना पडला होता परंतु सदर मालक हा बरबडा येथील रहिवासी असल्याचे पोलीसांना समजल्या वरून जि.एम. मदेवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर २७०/ २०२१ कलम ६५ महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका निखाते हे करीत असले तरी आयपीएस आरचित चांडक यांच्यासह कुंटुर पोलीसांच्या धाडसी कारवाईत विस हाजार रूपायाची देशी दारू पोलिसांनी जप्त केली असताना ही  बिलोलीच्या दारूबंदी अधिकाऱ्यांनी कसल्याच प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे गोरगरिबांच्या संसाराची चांगलीच रांगरांगोळीची वाट लागली असल्याचे जनतेसह महिला वर्गातुन बोलल्या जात आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला