संगणक परीचालकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न





बिलोली प्रतिनिधी


येथील पंचायत समिती कार्यालयासमोर  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बिलोली च्या वतीने दि 28 ऑगस्ट रोजी आपल्या विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
    शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. संगणक परिचालक हे सर्व कामे तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत  हे मानधन पण वेळेवर होत नाही.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने खालील मागण्या घेऊन आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी,  पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आय टी महामंडळाकडू नियुक्ती द्यावी, संगणक परीचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातु न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना किमान 15000 हजार वेतन द्यावे इत्यादी प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
     आंदोलन यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष माधव पाटील,  उपाध्यक्ष गंगाधर कांबळे,  सचिव मारोती हांडे,  कार्याध्यक्ष राहुल प्रचंड यांनी परिश्रम घेतले यावेळी संगणक परिचालक अरविंद कांबळे,  विजयकुमार सोनकांबळे,  गणेश पाटील,  अविनाश नरवाडे,  चेतना दावलेकर,  सारिका मंगलपल्ले,  कांता गायकवाड,  मीना आरसे,  योगेश दमकोंडवार,  साईनाथ गांजरे,  मारोती कुडकेकर,  प्रकाश लंके,  युसूफ शेख,  संभाजी चेंडे, विनोद सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील सर्व परिचालक उपस्थित होते.

Comments