बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*


















मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,  या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.
      यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे  यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान  कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व्यथा आपल्या साहित्य लेखनीच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचे महान असे कार्य केले असे प्रतिपादन पञकार भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना केले.तसेच देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले पण तद्नंतर अण्णा भाऊ साठेंनी मुंबईमध्ये काढलेला मोर्चा कामगारांच्या कष्टकर्याना-यांच्या, शोषीतांच्या व्यथा आपल्या साहित्यलेखनीच्या माध्यमातून रशीयाच्या चौकाचौकात पोहचविणारे अण्णा भाऊ साठे यांचे विचार आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची खरी गरज असल्याचे सांगत  आणि  ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है या ना-याचे स्मरण करुन दिले.  
या कार्यक्रमाला गावातील सरपंच प्रतिनिधी खुशालराव पाटील, ग्रा.पं.सदस्य दत्ता पाटील मुदळे, माजी सरपंच सुरेश नवलेकर, नामदेव कांबळे, दिलीप भद्रे,  ग्राम पंचायत सदस्या जनाबाई कांबळे, सरुबाई कांबळे, शेवंताबाई कांबळे, रतनबाई नवलेकर,
   लक्ष्मण बा-हाळे, शिवा  पाटील,बा-हाळे, मशना देसाई , सेवा सहकारी सोसायटीचे धनराज पाटील, धनराज शिवराज पाटील, बालाजी सोनटक्के, तंटामुक्ती अध्यक्ष महाजन ढेकळे,
जागृत महाराष्ट्र न्युज चॅनलचे मुखेड तालुका प्रतिनिधी पञकार भारत सोनकांबळे,
या जयंती मंडळाचे अध्यक्ष यादव नवलेकर, उपाध्यक्ष बालाजी कांबळे, कोषाध्यक्ष प्रकाश नवलेकर, सचिव व्यंकट वाघमारे, राजू वाघमारे (ऑरगान मास्टर), चंद्रकांत वाघमारे, दत्ता जाहीरे, गणपतीने टाळकुटे, राहुल सोनकांबळे, इंजिनिअर नागेश सोनकांबळे, तुकाराम नवलेकर, गंगाधर विठ्ठल नवलेकर, राजू नवलेकर, नागोराव वाघमारे, शंकर सोनकांबळे आदिंची कार्यक्रमाला उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुञसंचलन दिलीप भद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनिअर नागेशकुमार सोनकांबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.