बैलचोरी करणाऱ्या चार आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी केली अटक
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - नागेश इबितवार
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजे कऱ्हाळ येथील फिर्यादी नामे मधुकर नागनाथ वजीरे वय ४० वर्ष व्यवसाय शेती रा.मौजे कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड यांच्या शेतातील गोठ्यात दोन बैल बांधून असताना दि .१६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ०९:३० ते दि.१७ ऑगस्ट २०२१ च्या ०४: ०० वाजताच्या सुमारास फिर्यादीचे शिवार गट क्रं ७० मधील
दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी मौजे कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड यांच्या शेतातील गोठ्यातुन अज्ञात ईसमाने दोन बैल किमंती ५००००/- रुपयांचे चोरुन नेल्यावरून पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे गुरन.९ ४/२०२१ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हा अज्ञात ईसमाविरुद्ध दाखल होता
व गुन्हयाच्या आरोपींने घटनास्थळावरुन दोन बैल चोरुन नेले होते. अश्याही परिस्थीतीत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,उप विभाग धर्माबाद यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश .ई मान्टे,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,पोलीस नाईक महेश माकुरवार ब.न. ७२४,पो.काँ च्यापलवार ब.न.१८३,पोकाँ शेख नजीर ब.न. २८६९ यांनी अंत्यत बारकाईने तपास करुन गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या दोन बैल किंमती ५०००० रुपये किंमतीचे जप्त करुन आरोपी क्रमांक (१) तुकाराम रूक्माजी गंगोणे वय ४० वर्ष व्यवसाय शेती रा. वंजारगल्ली कुंडलवाडी ता बिलोली (२) आनंद ज्ञानोबा खटके वय ५० वर्ष व्यवसाय शेती रा. कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड (३) दाउ गंगाराम डुकरे वय ३८ वर्ष व्यवसाय मजुरी रा.कऱ्हाळ ता.बिलोली जि.नांदेड (४) काशीनाथ गंगाधर गट्टूवार वय ३२ वर्ष व्यवसाय मजुरी रा.नरागल्ली कुंडलवाडी ता. बिलोली यांना अटक केली असुन यात चार आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयाने,बिलोली यांनी सुनावणी दोन दिवसांची पोलीस कोठडी पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथील यापुर्वी दाखल झालेल्या बैल/म्हैस चोरी गुन्हया बद्दल तपास चालु असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,के.एस.पठाण सपोनि पो.स्टे कुंडलवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी हे करीत आहे

Comments
Post a Comment