हुनगुंदा रेती घाटातील अमर्याद रेती उपसा प्रकरणी विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

बिलोली टाईम्स न्युज प्रतिनिधी 

     बिलोली तालुक्यातील मौजे हुनगुंदा रेती घाटातील गट क्र.३३४ मधून अमर्याद वाळू उपसा केल्याप्रकरणी एम किरणकुमार अप्पा रेड्डी यांना अटक करून मंडळ अधिकारी श्री मेहत्रे आर.एस,तलाठी चमकुरे जी.एन,देवकांबळे एस.बी,बिराजदार बी.एन,धारकर व्ही.पी यांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी विभागीय आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा लेखी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड,उपविभागीय अधिकारी बिलोली,व तहसीलदार यांना दिला होता.याबाबीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना पत्र जा.क्र.१३४६ दिनांक.२०/०७/२०२१ नुसार चौकशीचे आदेश दिले आहेत.

           सविस्तर वृत्त असे की,बिलोली तालुक्यातील मौजे हुनगुंदा रेती घाटातील गट क्र.४३४ मध्ये अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार प्राप्त होताच बिलोलीचे तहसीलदार श्री कैलाशचंद्र वाघमारे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश जा.क्र.२०१७ मशाका/-२-गौख-टे-१ प्र.क्र.७३ दि.१०/०५/२०२१ अवैध रेती उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पत्रानुसार रेतीघाटावर बैठे पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार तहसीलदारांनी हूनगुंदा येथे बैठे पथक स्थापन करून बैठे पथकात पथक प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी तर सहाय्यक कर्मचारी म्हणून ४ तलाठी यांची नेमणूक केली होती.त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिथे बसून राहणे बंधनकारक करण्यात आले होते.

  गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून काही अनियमितता निदर्शनास येताच संबधितावर दंडात्मक,फौजदारी तसेच   इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्याचे तहसीलदाराने आदेशीत केले होते तसेच सदरील ठिकाणचे सीसीटीव्ही पुटेज दर आठवड्यास निर्गमित केलेल्या बारकोडयुक्त पावती पुस्तकाचा हिशेब दरमहा ५ तारखेला तसेच दैनंदिन उत्खनन बाबतचा अहवाल दररोज संबंधित लिलाव धारकाकडून प्राप्त करून तहसील कार्यालय बिलोली येथे सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. केलेल्या कार्यवाहीची माहिती व पकडण्यात आलेल्या वाहनांचे फोटो तहसील कार्यालयाच्या व्हाट्सअप् ग्रुप वर टाकण्यास सांगितले होते , वरील कामात दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनात आल्यास संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या विरोधात गौण खनिज अधिनियम २०१३ नुसार तसेच म.ना.से.( शिस्त व अपील १९७९) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश तहसीलदार बिलोली यांनी दिलेले असतानाही ६०२७ ब्रासचे रेती उपसा होणे अपेक्षित होते.मात्र संयुक्त सर्वेक्षण उपसमिती अहवालाचे चित्र या विरुद्ध असल्याने परवानाधारक किरणकुमार अप्पा रेड्डी यांना २१ लाख ४९ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.मात्र अवैध रेती उपसाला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले बैठे पथक असताना जास्तीचे उत्खनन झालेच कसे?हा प्रश्न उपस्थित होत आहे.यावरून संबधित मंडळ अधिकारी व तलाटी यांनी आर्थिक संगनमतातून ठेकेदारास पाठीशी घातल्याने ते सुध्दा तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर गौण खनिज अधिनियम २०१३ नुसार कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संविधान दुगाने यांनी केली आहे.

.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ठेकेदारास लावलेला २१ लक्ष,४९ हजार रुपयांचा दंड वसूल करतील का? याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


       

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला