यूवकांनी दूग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी दूग्धविकासमंत्री ना महादेव जानकर यांची माहिती
गारगोटी प्रतिनिधी .दि. २०
युवकांनी आपल्या कष्टातुन व मेहनतीतून दूग्ध व्यवसाय करून आपल्या कुटूंबाची आर्थीक उन्नती साधावी. असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री नाम. महादेव जानकर यांनी केले.
हणबरवाडी ता. भुदरगड येथील सन्मित्र सह दूध व्याव. संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाबा देसाई हे होते तर जि.प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, रा. स.पचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, भाजपचे भूदरगड तालूकाध्यक्ष नाथाजी पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाम. जानकर पुढे म्हणाले यूवक कार्यकर्तें अलकेश कांदळकर यांनी नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र दूध संस्थेची स्थापना करून अल्पावधीतच युवकांना दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहित केले आहे . त्यांच्यामुळे या परिसरात चांगले दूध उत्पादक तयार झाले असून उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध योजना या संस्थेमार्फत राबवण्यासाठी मदत करू.
या संस्थेच्या उद्धाटनापूर्वी नामदार जानकर यांनी अलकेश कांदळकर यांचे घरी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला..
यावेळी प्रा. हिंदूराव पाटील, संतोष पाटील,नामदेव चौगले, शहराध्यक्ष राहूल चौगले , सुनिल तेली,प्रविण नलवडे,दिलीप केणे, रमेश रायजादे, विलास बेलेकर,एकनाथ पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष रणजित आडके, सुनील पाटील, स्वप्निल माने, ए.डी. कांबळे, अनंत डोंगरकर, विजय शिंदे, रघुनाथ भोसले, पंढरीनाथ खुटाळे,विजय पाटील,संजय पाटील,मिथिल कांदळकर,बाबुराव पिंगळे,सागर पाटील,अतिश खोत,
संग्राम शिगावकार,योगेश मुदाळकर,विनायक टिपुगडे,ऋषिकेश शिंदे,अक्षय वारके,संदीप सावंत,सुहास मुदाळकर,ओंकार पटिल,अभिषेक देसाई, विनायक देसाई, निवास देसाई, नामदेव चौगले, बाजीराव देसाई, सचिन घरपणकर ,संतोष पाटील, सुरेश सुतार, लखन लोहार, दिपक पाटील,
प्रवीण पाटील, अतुल लोहार, अक्षय वारके,
रमेश रायजादे, युवराज पोवार, ,सचिन हाळवणकर, युवराज कांबळे , संजय मिटके,रणजित आडके, विक्रम पोवार, सुरेश किल्लेदार, संदीप सावंत यांचे सह कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.
Comments
Post a Comment