गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे
गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे
मंडळधिकारीचा सैराट कारभार स्मशानभुमी जागेचा पाहाणी व पंचनामा अहवाल देण्यास मंडळधिकारी मुळेकर चा टाळाटाळ
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव पुनरवसन झालेला गाव आसुन या गावातील नागरिकांना स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावरील बांधाच्या कडेला अंत्यविधी अडपुन घ्यावा लागतो पावसाळ्याच्या दिवसात प्रेत नेण्यासाठी खुप अडचणी उदभावतात
जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणारच… पण, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळणे व या मुद्दय़ावरून संघर्ष होणे ही मनाला वेदना देणारी गोष्ट. आहे गंजगाव या ठिकाणी आजही अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध होत नाही. परिणामी मयत व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आज ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही संकल्पना साकारण्याची गरज असताना, सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागते..
महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात स्मशानभूमीचा विषय हा प्रमुख बनला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे कधी कुणी प्रशासनातले अधिकारी लक्ष दिलेले नाहीत
ग्रामीण भागात आपल्या मालकीच्या जागेत किंवा पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. पण गावात सार्वजनिक स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध नसल्याने प्रचंड समस्या निर्माण होते. ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जागा आहे त्यांना कधी त्रास होत नाही. मात्र ज्यांच्याकडे जागा नाही अशा लोकांना संघर्ष करावा लागतो. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनातले अधिकारी लक्ष घालुन लवकरच स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी गावकरी ची मागणी आहे .
मौजे गंजगाव येथिल एखादा व्यक्ती जर मरण पावला आसेल तर त्यांना दुसऱ्या च्या शेताच्या कडेला अंत्यविधी करावा लागतो या पुर्वी तहसिलदार साहेबाना निवेदन द्वारे जागा उपलब्ध करुन द्या अशी मागणी केली होती परंतु या बाबीकडे तहसिलदार साहेब लक्ष दिलेले नाहीत लोकप्रतिनिधी सह प्रशासनातले अधिकारी स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी ही अपेक्षा
वैभव माधवराव घाटे
सरपंच प्रतिनिधी गंजगाव

Comments
Post a Comment