हाडाच्या कारखान्यामुळे परिसरात दुर्गधी बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे
बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे
बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा कारखाना आहे कोंडलापुर नाग्यापुर सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे
Comments
Post a Comment