लाॕकडाऊन काळात शेकडो मजुरांना मिळाला रोजगार* ⚡ हुनगुंदा खाजगी रेती घाटातील रोजगारामुळे कामगारांची चिंता मिटली





*लाॕकडाऊन काळात शेकडो मजुरांना मिळाला रोजगार*

⚡ हुनगुंदा खाजगी रेती घाटातील रोजगारामुळे कामगारांची चिंता मिटली

रेती ठेकेदाराकडून कोव्हीड 19 नियमांचे तंतोतंत पालन

⚡ घाटात मास्क, सॕनिटायझर पाॕईंट व सोशल डिस्टन्सचे पालन

नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)

 बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथिल खाजगी रेती घाट गेल्या काही दिवसांपुर्वी चालू झाले असून या घाटात जेसीबी मशीनद्वारे रेती उपसा न करता कामगारांच्या मदतीने रेती उपसा केले जात असल्याने या घाटात शेकडो महिला व पुरूष कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कोरोनाच्या गंभीर काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला असल्याने कामगारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.गेल्या  वर्षभरापासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहेत, ही कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने गत वर्षी आठ ते नऊ महिने लाॕकडाऊन टाकले होते. या काळात अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती, कारण लाॕकडाऊन असल्याने सर्व व्यवहार, कामे ठप्प होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र लाॕकडाऊन उघडून काही महिने उलटली सर्वकाही पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्याचा सुध्दा समावेश असून पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात लाॕकडाऊन परिस्थिती असल्याने गरीब व हातावर पोट असलेल्या कामगारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र दोन वर्षापासून बंद असलेले रेती उपसा कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत हुनगुंदा येथिल खाजगी रेती घाट चालू झाले असल्याने या घाटात जवळपास शंभर कामगारांना रोजगार उपलब्ध झाला असल्याने कामगारांसमोरचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे, विशेष म्हणजे सदर घाटात कोरोना नियमांचे पालन तंतोतंत केले जात असून याविषयी संबंधित ठेकेदार हा वेळोवेळी कामगार व वाहन चालकांना  सुचना देऊन प्रत्येक व्यक्तीला मास्क सुध्दा वाटप करत आहे. हुनगुंदा येथिल खाजगी रेती घाटात जेसीबी मशीनद्वारे रेती उपसा न करता कामगारांच्या मदतीने रेती उपसा केले जात असल्याने या घाटात शेकडो महिला व पुरूष कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कोरोनाच्या गंभीर काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला असल्याने कामगारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला