सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना ! बिलोली - वैभव घाटे
सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना !
बिलोली - वैभव घाटे
गँस सिलेंडर च्या दरवाठी मुळे सामान्य कुटुंबा आर्थिक संकटात सापडला आहे ग्रामिण भागात गँस सिंलेडर शोभेची वस्तू बनवुन राहात आहेत गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय ? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे . अगोदरच मोलमजुरी करून गॅस आणावा लागायचा . आता तो गॅस महाग झाल्याने सिलिंडर शोभेची वस्तू होते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे . ' गेल्या दोन - तीन वर्षापासून सबसिडीच्या स्वरूपात स्वयंपाक गॅस मिळत होता . पण सहा महिन्यापासून सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत याउलट सबसिडी जमा होणे ही वर्षापासून बंद झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींची मोठी अडचण झाली आहे अशी स्थिती असताना गॅसची भाववाढ सातत्याने होत चालली आहे . परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे . या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे . पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबविली . या योजनेच्या माध्यमातू घर तिथे गँस संकल्पना केंद्र सरकार राबवली पण प्रत्यक्षात ही योजना कुचकामी ठरली केंद्र सरकार कडुन गँस सिलेंडरची दरवाठ करण्यात येत आहे परंतु गेल्या आठ महीण्यापासुन गँस सबसिडीचा एकही रुपाया सिलेंडर धारकांच्या खात्यावर जमा झालेले नाही सिंलेडर धारकांची सबसिडी गेली कुठे ? आसा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत अगोदरच कोरोणाच्या स्थिती मुळे ग्रामिण भागातील जनता आर्थिक संकटाचा सामना करित आहेत अशी स्थिती आसताना गँसचे दरवाठ सातत्याने होत चालली आहे परिणामी सामान्य नागरिकांचे भाववाठीमुळे कंबरडे मोडले आहे ह्या महागाईच्या धोरणामुळे नागरिंकाना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे ग्रामिण भागातील महीलाना धुरा पासुन मुक्ती मिळावी या हेतुने केंद्र सरकार उज्वला गँस योजना अंमलात आणली या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत गँस दिला जात होता माञ आचानकच उज्वला गँस योजनेच्या लाभार्थाना या लाभापासुन वंचित ठेवले त्यांनाही महागड्या किंमतीचा गँस विकत घ्यावा लागणार आहे


Comments
Post a Comment