राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृह बांधकामासाठी पंचवीस (२५.००) लक्ष निधी मंजुर करा*
*पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना दिले निवेदन*
नांदेड प्रतिनिधी / नागेश इबितवार
देगलुर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावे सभागृह व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून शहरातील परिट/धोबी समाज बांधवांनी संबंधितांना निवेदन, विनंती करित आसतांना स्व.आमदार रावसाहेब आंतापुरकर साहेब यांनी स्थानिक विकास निधीतून ७.००लक्ष रू निधी उपलब्ध करून देऊन, संघटनेच्या विनंतीचा सन्मान केल्याने नुकतच आदरणीय आमदार अमरनाथजी राजुरकर साहेब यांच्या हस्ते भायेगाव रोड परिसरात भुमीपुजन करण्यात आले, परंतु ६६/६६ चौ.फु.जागेमध्ये, उपलब्ध करून दिलेल्या निधितुन राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृहाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित नाही.तरी नामदार पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आमच्या निवेदनाचा साहानुभुतीपुर्वक विचार करून अंदाजित २५.०० लक्ष रुपये
निधी मंजुर करून द्यावे.आसे देगलूर शहरात धोबी समाज खुप मोठ्या प्रमाणात असल्याने येथिल समाज बांधवांच्या वतीने आदरणीय साहेबांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.तरी यावेळी नामदार मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी लवकरच निधी मंजुर करून देऊ असे आशावादी आश्वासन दिले.यामुळे समाज बांधवां मध्ये समाधान व आनंददायी वातावरण आहे.यावेळी निवेदनावर मराठवाडा संघटक दिगांबरजी, दाऊबे,दिगांबर तमलुरकर,संग्राम हानुमाने, योगेश जकरे, गजानन दाऊबे, शंकर चटलुरे, डॉ.सुभाष वाघमारे,आदी मान्यवर यांच्या स्वाक्षरी व इतर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment