मौजे हज्जापुर येथील सरपंच सागरबाई चंदनकर यांनी घरपट्टी वसुल करुन पैसाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करा नागोराव होनपारखे
◆ उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड,गटविकास अधिकारी पंचायत समिती,बिलोली व तहसीलदार कार्यालय,बिलोली यांना नागोराव होनपारखे यांनी हज्जापुर येथील सरपंच सागरबाई चंदनकर यांच्या विरोधात दि.२५ ऑगस्ट २०२१ रोजी केली.निवेदनाव्दारे लेखी तक्रार....
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या मौजै हज्जापुर ग्रामपंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई शिवाजी चंदनकर यांनी गावात ग्रामसेवक तानाजी हांडे उपस्थित असताना सुध्दा त्यांना न विचारताच गावातील अनेक लोकांच्या घरपट्टया वसुली करुन त्या पैसाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना सरपंच पदावरून कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणीचे नागोराव होनपारखे यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय,नांदेड,गटविकास अधिकारी पंचायत समिती,बिलोली व तहसीलदार कार्यालय,बिलोली यांच्याकडे केली आहे.
निवेदनकर्ता नागोराव केरबा होनपारखे रा.मौजे हज्जापुर येथील रहिवासी असुन मौजे हज्जापुर ग्राम पंचायत येथील सरपंच सौ.सागरबाई शिवाजी चंदनकर यांना कोणताच अधिकार नसताना सुध्दा आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करत ग्रामसेवक तानाजी हांडे यांना न विचारताच गावातील १) दुर्गादास मारोती चंदनकर यांच्या कडून (दि.११ मे २०२१ रोजी घरपट्टी २०००/- रुपयांची पावती),२)नागोराव केरबा होनपारखे यांच्याकडुन (दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टी १००/- रुपयांची पावती),३)गंगाधर जळबा वाघमारे यांच्याकडुन (दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टी १००/- रुपयांची पावती),४) गंगाराम विठ्ठल होनपारखे यांच्याकडुन (दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टी १००/- रुपयांची पावती),५)गंगाराम मरीबा होनपारखे यांच्याकडुन (दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टी १००/- रुपयांची पावती),६) सायबू लक्ष्मण होनपारखे यांच्याकडुन (दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टी १००/- रुपयांची पावती) अशा अनेक गावातील लोकांकडून घरपट्टी स्वतःच सरपंच बाईने वसुली करुन घेऊन पैसाचा गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना तात्काळ सरपंच पदावरून कार्यमुक्त करण्यात यावे.अन्यथा दि.०५ सप्टेंबर २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयसमोर,बिलोली येथे अमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय,नांदेड व गटविकास अधिकारी पंचायत समिती,बिलोली व तहसीलदार बिलोली यांना एका निवेदनाव्दारे नागोराव होनपारखे यांनी दिला आहे.

Great news sir 👏
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete