बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा फज्जा!
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - वैभव घाटे
देशात कोरोना विषाणूचा सार्याच घटकांवर परिणाम झाला. त्यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ‘ऑनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असला, तरी ग्रामीण भागात बिकट परिस्थिती आहे. तिकडे 70 टक्के पालकांकडे ‘अॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनी नाही. आसेल तर नेटवर्क नसल्यामुळे या शिक्षणाचा फज्जा उडाला आहे शिक्षक गृहभेटी घेऊन ज्ञानार्जनाचा प्रयत्न करण्याच्या सूचना आहे. मात्र, त्यातही विविध अडचणी असून, शासननिर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी ‘ऑनलाईन’ शिक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ग्रामीण भागातील 70 टक्के पालकांकडे ‘अॅण्ड्राईड’ भ्रमणध्वनींची वाणवा आहे. काहींकडे साधा भ्रमणध्वनी, तर काहींकडे भ्रमणध्वनीच नसल्याची बिलोली तालुक्यात ग्रामिन भागात आँनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे

Comments
Post a Comment