आरोग्य विभागाची अनास्था डासांचा प्रचंड प्रादुर्भाव डेंगू सदृश्य तापाने नागरिक वैतागले अज्ञात रोगाने जनता त्रस्त



बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क

बिलोली प्रतिनिधी :- नागेश इबितवार 

सध्यातरी कोरोना संसर्ग रोगाला लगाम बसला तरी डेंगू सदृश तापाने लहान-मोठे नागरिक कमालीचे धास्तावले आहे त्यात अज्ञात रोगाने जनता त्रस्त आहे आता पर्यंत कोरोना च्या भीतीने जनता भयभीत होती ती कुठे गेली की आता घराघरात ताप सर्दी खोकला डोके दु:खी पाठ दु:खी टायफॉईड निमोनिया डेंगू सारख्या आजारात प्रचंड वाढ झाली असून या परिसरात सरकारी दवाखाने बरोबरच खाजगी दवाखाने सुद्धा फुल गर्दी दिसून येत आहे याचा फायदा खाजगीत डॉक्टर मेडिकल यांचे चांगभल होत असताना रुग्णांची लूट सुद्धा केल्याचे दिसून येते येथे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी डॉक्टराने गावोगावी भेटी देणे गरजेचे बनले आहे त्यात गावागावात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे ठीक ठिकाणी गावात नाल्याची सफाई नाही नाल्या तुंबून गेल्या नाल्याचे खराब पाणी रस्त्यावरून वाहत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे आरोग्य विभागाने तातडीने डासांचे निर्मूलन करण्यासाठी उपाय योजना करावी व ग्रामपंचायतीने धूर फवारणी करावी आणि खाजगी विहिरीत निर्जतुनाषक पावडर टाकून बिमारीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे

या भागात राहणाऱ्या लोकांना नाहीत्या संकटाचे ओढवले आहे सर्वीकडे कोरोनाची  भीती तर कधी नैसर्गिक समस्या आज या भागात डेंगू सदृश तापाने नागरिकांना भांडाऊन सोडले आहे या तापाच्या नवा साथीमुळे नागरिक वैतागले आहेत याकडे आरोग्य विभागांचे साफ दुर्लक्ष होताना दिसून येते गावागावात आरोग्य कर्मचारी फिरकत नसल्याच्या तक्रारी येते आहेत याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे बिलोली ग्रामीण रुग्ण कल्याणलयासहया परिसरातील केंद्र ,प्राथमिक आरोग्य केंद्र खतगाव, प्राथमिक  आरोग्य केंद्र आदमपुर तथा उपकेंद्रे,त़़थाअतिदुर्गम भागात असलेली आरोग्य केंद्रात ठीक ठिकाणी आरोग्य सेविका मुख्यालायी राहत नसून त्या आपापल्या सोयीच्या ठिकाणी राहत असल्याच्या तक्रारी करूनही डॉक्टर मंडळी त्यांना पाठीशी घालत असल्याचे सांगितल्या जाते याकडे लोकप्रतिनिधीचे सुद्धा दुर्लक्ष केल्याचे दिसून येते

या बाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना सांगितले असतात पाहू चौकशी करू असे उडवाउडवीचे उत्तर देतात आरोग्य सेविका मुख्याला ही राहत नाही तर कहा राहत नाही याबद्दल कोणी प्रश्न मांडला का दरवर्षी आरोग्य उपकेंद्राचे दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी येतो मात्र थातूरमातूर कामे करून निधी हडपल्या जातो याची कोणी चौकशी केली का आरोग्य सेविका किरकोळ कारण सांगून ते आपल्या सोयीच्या ठिकाणी थांबतात यामुळे आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे या परिसरातील आरोग्य कर्मचारी पाच दहा वर्षे एकाच ठिकाणी थांड मांडून आहे त्याची बदली करण्याची मागणी होत आहे त्याच प्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांची सुद्धा बदली करणे गरजेचे आहे याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी हे सुद्धा लक्ष देत नसल्याने हा प्रकार घडत आहे आरोग्य कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधीचे सह आरोग्य अधिकाऱ्यांची वचक नसल्याने हा प्रकार दिसून येते पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असूद्या की कोरोना असूद्या डॉक्टर तेवढे गंभीर दिसत नाही त्यांच्या नियंत्रणात अभावी ठीक ठिकानी डेंगू टायफाईड मलेरिया ताप खोकला सर्दी निमोनिया सारखे आजाराने जनता त्रस्त आहे या रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आरोग्य विभाग मार्फत दास निर्मूलन करावे व उपकेंद्रांना आरोग्य सेविका मुख्याला ही राहण्याची व्यवस्था करावी या आरोग्य विभागांच्या ढिसाळ कारभाराची तक्रार माननीय नामदार पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण खासदार   जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारीचे निवेदन देऊन एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचे अधिकृत सूत्राने सांगितले आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला