बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ; वीटभटी मालकासह १२ जणावर पोलीस कार्यवाही ? ११ ट्रॅक्टर ताब्यात







      माधव पवार

नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे एका विटभट्टी धारकांनी नायगाव तहसील प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली गोदाकाठची अवैध मातीचे ढीगारे त्या ढीगाऱ्यच्या मातीची शिफ्टिंग करीत रात्रीला करत असताना बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्यासह कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले व त्यांच्या टीमने संयुक्त कारवाई केली असल्याने या धाडीत अवैध मातीची शिपटिंग करत असलेल्या अकरा ट्रॅक्टर व एक जेसीबी कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून वीटभटी मालकासह एकूण १२ जनावर कार्यवाही ?  करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी एकूण आकारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले सदरची घटना दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक बारा ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान बरबडा येथे करण्यात आल्याची माहिती सपोनि महादेव पुरी यांनी दिली आहे  तालुक्यातील विविध ठिकाणी वीटभट्टी धारकांनी अशाच पद्धतीने अवैध माती साठवून ठेवले असल्यामुळे त्या मातीचे सोने करण्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे व महसूल विभागाचे सहाय्यक लिपिक गादेवार यांच्या आशिर्वादामुळे वीटभटी  धारकांनी मोठया थाटात वीटभट्या थाटल्या आहेत सदरील वीटभटी धारकांनी २५ टक्के रॉयल्टी महसूल विभागाला भरून  ७५ टक्के मातीचे अवैध उत्खनन करतात तरी तहसील प्रशासन झोपेत असतें वीटभटी धारकांनी मातीचे सोने   करून घेत असतात सदरच्या मातीची रात्री-बेरात्री शिपटिंग करत असताना ही महसूल विभागाचे अधिकारी वीटभट्टी धारकांवर कसल्याच प्रकारची कारवाई करत नसतात त्यामुळे तहसील प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्‍टरच्या साह्याने अवैध मातीची शिपटिंग केली जात असल्यामुळे बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसांनी अकरा ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेतले आहे


 
बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले यांच्या संयुक्त कारवाईत एकूण ११ ट्रॅक्टर ताब्यात घेतले तर वीटभटी मालकासह बारा जाणावर कारवाई झाल्याचे समजते यापैकी सात मातीने भरलेले ट्रॅक्टर होते तर चार रिकामे ट्रॅक्टर असल्याचे दिसून आले व एक जेसीबी ताब्यात घेऊन चालकाला ही कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सदरच्या कारवाईत आयपीएस आर्चीत यांच्यासह सपोनि महादेव पुरी,फौजदार दिनेश येवले,   नायगाव पोलीस ठाण्याचे  फौजदार बाचावार,बरबडा बिटचे जेमादार आर एन निखाते, रुई बु बिटचे जेमादार एस एम कुमरे, साई सांगवीकर नायगाव, एस एन बुद्धेवाड, पोलीस नाईक खंदारे,पोलीस कॉन्स्टेबल सोनकांबळे आदी कारवाई करून तहसीलदार गजानन शिंदे यांना कारवाईसाठी पत्र पाठवून दिले असल्यामुळे  बरबडा सज्जाचे तलाठी विलास गुंजकर,यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सपोनि पुरी यांनी सांगितले आहे


  

     

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला