21 जुलै रोजी सांगोला येथे राज्यस्तरीय डान्स स्पर्धा*


कोल्हापूर प्रतिनिधी  (अनिल पाटील )

माणदूत उत्सव''या कार्यक्रमामध्ये रविवार दि.21 जुलै रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे राज्यस्तरीय वैयक्तिक व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.21 जुलै रोजी दु.12 वा.खुल्या गटासाठी रेकार्ड वैयक्तीक डान्स स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकासाठी 5001 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी 3001 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 रुपये पारितोषिक देण्यात येणार असुन ही सर्व पारितोषिके राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते यश नाथा जाधव यांच्याकडून देण्यात येणार आहेत. खुल्या गटाच्या रेकॉर्ड वैयक्तीक डान्स स्पर्धेसाठी 150 रू.प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे.
तसेच दु.12 वा. खुल्या गटासाठी रेकॉर्ड ग्रुप डान्स स्पर्धा  होणार असून प्रथम क्रमांकासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली  यांच्याकडून 17,051 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी चि.अथर्व कृष्णा साळुंखे यांच्याकडून 11,000 रु., तृतीय क्रमांकासाठी  विशाल घुटुकडे यांच्याकडून  7001 रु.चे व चतुर्थ क्रमांकासाठी  सांगोला तालुका सनगर समाज सेवा मंडळ सांगोला यांच्याकडून 3001 रु.चे पारितोषिक देण्यात येणार आहे.  खुल्या गटाच्या रेकॉर्ड  डान्स स्पर्धेसाठी 300 रू.प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी 7387827386, 8975214021, 9767170707, 9881517171 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व स्पर्धेची नावनोंदणी दि.17 जुलैपर्यत असणार आहे. तरी वरील सर्व स्पर्धेत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा,  असे आवाहन माणदूत उत्सव परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला