बिलोली तालुक्यातील सर्व रेतीघाट बंद करा सरपंच शंकर शामंते यांची मागणी
(संग्रहीत छायाचिञ)
(वैभव घाटे)
बिलोली तालुक्यातील मौजे माचनुर गंजगाव बोळेगाव येथिल रेतीघाटावर शासनाने ठरवुन दिलेल्या रेतीसाठ्यापेक्षा जास्तीचा रेतीचा उपसा करुन पुन्हा केलेले खड्डे संध्याकाळी बुजवुन टाकत आहेत शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता 4 ते 5 जेसीबी या यंञाच्या साह्याने राञदिवस रेतीचा अवैध उपसा करित आहेत व रेती वाहानात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुन नेत आसताना संबधित अधिकारी त्यावर लक्ष देत नाहीत .राँयल्टी एक पट भरुन चार ते पाच पट रेती उपसा करित आहेत त्यामुळे शासनाचा महसुल बुडुन शासनाची फसवणुक करित आहेत बिलोली तहसिलचे महसुल विभागाचे अधिकारी राजरोसपणे डोळे मिटुन बसले आहेत.संबंधित गुत्तेदार व संबधित अधिकारी यांचाशी संगणमत करुन मांजरा नदीची अवस्था बकाल केली आहे बिलोली तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहे सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे आसाच रेतीचा सरासपणे अवैध उपसा चालु आसेल तर भविष्यात फार मोठे संकट निर्माण होवु शकतो गंजगाव माचनुर बोळेगाव या घाटावर कार्यवाही करण्याची मागणी कोटग्याळ गावचे सरपंच शंकर शांमते तहसिलदार बिलोली यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे .

Comments
Post a Comment