प्रा.बालाजी गोणशेटवाड यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कारांनी सन्मानित
बिलोली /नागेश इबितवार
बिलोली तालुक्यातील मौजे बडूर येथील रहिवासी व नेहरूनगर ता.कंधार येथे असलेल्या वसंतराव नाईक ग्रामिण कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले प्रा.बालाजी मलराम गोणशेटवाड यांना शिक्षक दिनानिमित्त ता.५ रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री डी पी सावंत , तसेच दक्षिण नांदेडचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे होते.
माजी खासदार तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याहस्ते जिल्हास्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार व सन्मान पत्र देऊन शिक्षक दिनानिमित्त गौरव करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव व सर्व संस्थेचे पदाधिकारी दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व विशेष शिक्षक यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करत असते.
त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना घडवणारे विशेष शिक्षकांचे पण संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. प्रा. बालाजी गोणशेटवाड यांना सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ.संजय पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी.मोरे सर्व प्राध्यापकवृंद व मित्र परिवार आदीने अभिनंदन केले.

Comments
Post a Comment