कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृती निमित्त बरबड्यात मित्र अमृत गौरव सोहळा ; साहित्यिक व्याख्याते देविदास फुलारी यांच्यासह डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न
माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै.गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीदिनाच्या निमित्ताने दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी मानवी जीवन अमूल्ये असल्यामुळे भगवंताचे चिंतन प्रेम व परोपकार हे ध्येय मनी धरून माणुसकीचा
अंगीकार करीत सामाजिक व धार्मिक शैक्षणिक कार्याची जबाबदारी सांभाळत कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्राध्यापक पी जी रुद्रवाड यांनी मित्र अमृत गौरव सोहळ्याचे आयोजन करून साहित्यिक व्याखान करते देवीदास फुलारी यांच्यासह मित्र अमृत सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ष ब्र १०८ डॉ.विरुपाक्ष यांच्या ज्ञान अमृतातुन सदरचा सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे
तालुक्यातील मौजे बरबडा येथे भव्य असे देवस्थान असलेले कपलेश्वर मंदिराच्या पटांगणात कै. गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्मृतीस प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदरील मित्र अमृत गौरव सोहळ्याचे मुख्य आयोजक प्राध्यापक पी जी रुद्रवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर या कार्यक्रमाच्या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी बरबडा नगरीचे माजी सरपंच तथा माजी मंत्री खा.दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई अंबादासराव ऊर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांच्यासह बरबडा गावचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे, डॉ बडूरे, माजी प्राध्यापक व्यंकटराव सुरेवाड, यांच्यासह आदी मान्यवरांनी सदरच्या मित्र अमृत सोहळ्याच्या सुंदर अशा भव्य कार्यक्रमाला शुभेच्छा देत भविष्यातील मित्र कसे टिकून राहिले पाहिजे यावर आपले मौल्यवान ज्ञान सदरच्या सोहळ्यात व्यक्त केले आहे
बरबडा नगरीत आयोजित केलेल्या मित्र अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राध्यापक पी जी रुद्रवाड यांनी मैत्र अमृत सोहळ्याचे आयोजन करून आकर्षक असा सोहळा घडवून आणला असल्यामुळे महापुरुषांचा आदर्श अशा कार्यरत गुणीजन दाम्पत्याचा पंचेहतरी निमित्त मैत्र अमृत गौरव सोहळा नायगाव तालुक्यातील बरबडा येथे भव्य आयोजित करून
आकर्षक घडवून आणला असून सदरील कार्यक्रम हा गोदामाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बरबडा अंतर्गत पि जी रुद्रवाड यांच्यासह प्राध्यापक एस एस डोईबळे यांच्या ज्ञानगंगेतून सदरीलचा मित्र अमृत गौरव सोहळा बरबडा नगरीत शेकडो महिलसह, पुरुष मंडळी याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आलेला आहे
बरबडा येथे गौरव सोहळ्याच्या ज्ञानपिठाच्या विचार मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर, प्रा रवींद्र पाटील चव्हाण, माजी सरपंच बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी, श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर ,डॉ दीपक दुगावकर, माधवराव पाटील जाधव कृष्णूरकर, गजानन चव्हाण नायागांवकर,माजी जि प सदस्य बाबुराव लंगडापुरे,सुधाकरराव पाटील कृष्णूकर, बरबड्याचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे,माजी पं स परबता पाटील जाधव, माजी सरपंच बालाजी मदेवाड, जेष्ठ
नागरिक सदाशिवराव धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजीराव धर्माधिकारी,माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, माजी सरपंच नागनाथराव हांनमते, प्राचार्य शंकरराव पचलिंग, प्रा.नारवाड,चंदापुरे मामा,विश्वनाथ बडूरे, शिवाजीराव धर्माधिकारी,बालाजी घोसलवाड, माजी प्राचार्य व्यंकटराव सूर्यवाड, डॉ बडूरे,बापूराव बडूरे,डॉ सुमनबाई बडूरे, सौ शोभाताई बाबुराव व्यंकटपूरवार, इरनाजी कंडापले,सौ रामबाई कंडापले, शिवाजीराव धर्माधिकारी,बरबड्याचे अनेक पुरस्कार प्राप्त करते आदर्श शिक्षक एन टी तिप्पलवाड, तोटावाड, डॉ विनोद, प्राचार्य संजय डोईबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने विचार मंचावर उपस्थित होते
Comments
Post a Comment