सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येतात त्यांना मोठे होण्यासाठी काही वेळ लागत नाही. प्रख्यात व्याख्याते देविदास फुलारी यांचे प्रतिपादन   


         

                           माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे स्वर्गवासी गंगाराम रुद्रवाड यांच्या स्पुर्ती दिनाच्या निमित्ताने गोदामाई बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात व्याख्यानाच्या माध्यमातुन व्याख्यान करताना सुप्रसिद्ध साहित्यिक प्रख्यात व्यख्याते देविदास फुलारी म्हणले की सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येणाऱ्या लोकांना मोठे होण्यासाठी कांही वेळ लागत नाही असे प्रतिपादन बरबडा येथे कपलेश्वर मंदिराच्या पटागंणात आयोजित करण्यात आलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात फुलारी यांनी केले आहे

      तालुक्यातील बरबडा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. पी. जी. रुद्रवाड यांनी भव्य असा सोहळा घडवून आणला सोर्गवासी गंगाराम रुद्रवाड यांच्या पावन स्पुर्तीस अभिवादन करून प्रख्यात व्याख्याते देविदास फुलारी म्हणाले की शिक्षक हा प्रतिकूल परिस्थितीतील बैलगाडीचे भाडे करणाऱ्या पालकाच्या पाल्याना जात पात न  पाळता शाळेत शिक्षण देतो आणि विध्यार्थी शिक्षण घेऊन मोठा होतो त्यावेळी शिक्षकाला मात्र विध्यार्थाचा आदर वाटतो परंतु आज कालच्या शिक्षकात ही मोठया संघटना झाल्या आहेत जातीच्या संघटना, धर्माच्या संघटना, अशा संघटना होण्या ऐवजी जर विचाराच्या पलीकडे जाऊन पाहिले तर विचाराच्या संघटना झाल्या पाहिजे असे ही प्रख्यात व्याख्याते देविदास फुलारी यांनी मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले आहे

      बरबडा येथे गौरव सोहळ्याच्या ज्ञानपिठाच्या विचार मंचावर माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर, प्रा रवींद्र पाटील चव्हाण, माजी सरपंच बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी, श्रावण पाटील भिलवंडे नरसीकर ,डॉ दीपक दुगावकर, माधवराव पाटील जाधव कृष्णूरकर, गजानन चव्हाण नायागांवकर,माजी जि प सदस्य बाबुराव लंगडापुरे,सुधाकरराव पाटील कृष्णूकर, बरबड्याचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे,माजी पं स परबता पाटील जाधव, माजी सरपंच बालाजी मदेवाड, जेष्ठ  नागरिक सदाशिवराव धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजीराव धर्माधिकारी,माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, माजी सरपंच नागनाथराव हांनमते, प्राचार्य शंकरराव पचलिंग, प्रा.नारवाड,चंदापुरे मामा,विश्वनाथ बडूरे शिवाजीराव धर्माधिकारी पुरस्कार प्राप्त करते आदर्श शिक्षक एन टी तिप्पलवाड,यांच्यासह आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते 

     कै.गंगाराम रुद्रवाड यांच्या स्मुर्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना व्यख्याते फुलारी पुढे म्हणाले की माणसाचा शेजाऱ नको अशा अवस्थे मध्ये ग्रहकार्याचा अभ्यास करणारे गरीब तज्ञ लहान मुलांना आवडणारी प्रतिसुष्टीचा विसावा वर्धापन दिन अंतराळात साजरा करताना दाखविले सदरचा वर्धापन दिन साजरा होत असताना चुनचुनित मुले आकाशाकडे पाहू लागले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की छोटया छोटया मुलांना अंतराळात साजरा होत असलेला वर्धापन दिन पाहण्यासाठी मुलांनी ही गेले पाहिजे असे मुलांनी इच्छा प्रकट केली पाहिजे असे असून साहित्यिक व्याख्याते देविदास फुलारी यांनी सांगितले याच कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले की माहिती आणि तंत्रज्ञानाचा वेग फार अफाट असल्यामुळे आज घडीला विज्ञानाचा अभ्यास करणे हे अंत्यात महत्वाचे असल्याचे फुलारी म्हणाले आहे

       बरबडा येथील मैत्री अमृत गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात आपल्या व्यख्यानातुन देविदास फुलारी म्हणाले की तंत्रज्ञानामुळे सध्याच्या परिस्थितीत लिखाण केले जाते परंतु पुढील शंभर वर्षाच्या काळात कोणी ही लिखाण केलेलं दिसणार नाही कारण विज्ञान हे इतके पुढे गेले की त्यांच्या शिवाय कोणताच पर्याय उरला नाही  तंत्र ज्ञानाचे युग आल्यामुळे आज घडीला कॉप्युटर हे लहान मुला पासून ते मोठया पर्यंत चालवीत असल्यामुळे आज मोठया शिक्षणाची तंत्रज्ञानाची गरज असल्याचे फुलारी सांगत म्हणाले की सोन्याचे चमचे जन्माताच तोंडात घेऊन येतात त्यांना मोठे होण्यासाठी काही वेळ लागत नाही असे ही प्रतिपादन केले असून सदरच्या कार्यक्रमाला बालाजी घोसलवाड, माजी प्राचार्य व्यंकटराव सूर्यवाड, डॉ बडूरे,बापूराव बडूरे,डॉ सुमनबाई बडूरे, सौ शोभाताई बाबुराव व्यंकटपूरवार, इरनाजी कंडापले,सौ रामबाई कंडापले, बरबड्याचे अनेक तोटावाड, डॉ विनोद, प्राचार्य संजय डोईबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने विचार मंचावर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

घुंगराळ्यात आले प्रशासन आपल्या दारी परंतु गावच्या सरपंचाला सूचनाच नाही ? --सरपंच जोगेवार यांची नाराजी -

रमाई फाऊंडेशन बेटमोगरा च्या वतीने नामविस्तार दिन जल्लोषात साजरा.