माधव पवार
नायागांव तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्यंकेज इंडिया कंपनी कडून अनेक वर्षा पासून विषारी द्रव्य व घाण पाणी सोडण्यात येत असल्या बाबत विधानसभेच्या आधिवेनात तांराकीत प्रश्न आठ आमदारांनी उपस्थित केल्यामुळे यावर प्रधान सचिवांनी आरोग्य विभागाला खूलासा मागविला होता. त्यावर आरोग्य विभागाणे कृष्णूर परिसरातील जल जनय आजारामूळे कोणताही साथीचा उद्रेक झाला नसल्याचा अजब खूलासा दिल्याने खळबळ उडाली होती परंतु कंपनीवर कारवाई होईल या भीतीमुळे व्यंकेजच्या व्यवस्था पकाने कंपनीच गेल्या सात ते आठ दिवसा पासून बंद करून ठेवल्यामुळे काही तरी काळेबेरे उघड होण्याची शक्यता नाकरता येत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे
नायगाव तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत चालणारी ही व्यंकेज इंडिया कंपनीच्या व्यवस्थापकाने कोरोना महामारीच्या काळात शासनाचे नियम धाब्यावर चालविली होती परंतू साथीच्या अजारासह कृष्णूर व परिसरात कर्क रोगाचे रुग्ण सर्वाधिक आढळत असल्याची शक्यता समोर येत असताना ही कंपनी चालूच ठेवले घाण पाणी कंपनीच्या बाहेर सोडुन देत होते परंतु अशा गंभीर बाबीकडे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्ष नव्हते ज्यावेळी विधानसभेच्या अधिवेशनात आठ आमदारानी तारांकित प्रश्न मांडल्यामुळे माहीती आरोग्य विभागाने दिल्याने नागरिकांसह जनतेतुन संताप व्यक्त केला जात असल्याचे दिसून आले विधानसभेच्या आधिवेनात आमदार मोहन अण्णा हंबर्डे याच्यासह आठ आमदारांनी आधिवेनात तांराकीत प्रश्न क्र.३८८८४ उपस्थित केला होता यात नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या व्यंकेज इंडिया कंपनीकडून विषारी पाणी परिसरात सोडण्यात गेल्या अनेक वर्षा पासून सोडण्यात येत होते
तालुक्यातील कृष्णुर येथील व्यंकेज इंडिया कंपनीने
सदरच्या पाण्यामुळे परिसरातील नागरीकाच्या आरोग्यवर परिणाम होत असल्याने या कंपनी विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या बाबत तांराकीत प्रश्नात आमदारांनी नागरीकाच्या आरोग्यबाबत प्रश्न उपस्थित केला होता कृष्णूर येथिल नागरीकाचे आरोग्य धोक्यात येत असताना ही कंपनीच्या पाण्यामुळे कर्करोग, कावीळ,हागवन, दमा, यासह अन्य आजाराला नागरीकाना येथिल ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्यामुळे तात्काळ या कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी आशी मागणी आमदारांनी सभागृहात करण्यात आली होती याची दखल घेत प्रधान सचिव यांनी नांदेड येथिल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाचे उपप्रदेशीक आधिकारी यांना खूलासा मागीतला होता त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बरबडा
प्रथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी यांना खूलासा ही मागितला होता परंतु खरे तर आधिवेनात पून्हा हा प्रश्न गाजणार असल्याचे संकेत मिळल्यामुळे व कंपनीवर कारवाई होईल या भीतीने कंपनी बंद ठेवण्यात आली असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे
एकदम छान बिलोली टाईम न्यूज
ReplyDelete