गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे
गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे मंडळधिकारीचा सैराट कारभार स्मशानभुमी जागेचा पाहाणी व पंचनामा अहवाल देण्यास मंडळधिकारी मुळेकर चा टाळाटाळ बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव पुनरवसन झालेला गाव आसुन या गावातील नागरिकांना स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतावरील बांधाच्या कडेला अंत्यविधी अडपुन घ्यावा लागतो पावसाळ्याच्या दिवसात प्रेत नेण्यासाठी खुप अडचणी उदभावतात जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणारच… पण, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळणे व या मुद्दय़ावरून संघर्ष होणे ही मनाला वेदना देणारी गोष्ट. आहे गंजगाव या ठिकाणी आजही अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध होत नाही. परिणामी मयत व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आज ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही संकल्पना साकारण्याची गरज असताना, सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागते.. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात स्मशानभूमीचा विषय हा प्रमुख बनला आहे. ...