भादा प्रशालेत जादा क्लास कृतीद्वारे वाचन, लेखनाचा  उपक्रम 




कोरोनामुळे सुमारे वीस महिने शाळा बंद होती पण  शिक्षण चालू होते. कोरोना नियमाचे पालन करून कोविड  कॅप्टन,  गृहभेटी,  फोन संपर्क,  ऑनलाईन अध्यापन व अभ्यास, ऑनलाईन पालक मेळावा  इत्यादी मध्यमातून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण चालू होते.      या सर्व माध्यमातून शिक्षण दिले गेले असले तरी भादा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश अनंतवार यावर समाधान न मानता कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग शाळेच्या वेळे व्यतिरिक्त दुपारी 2 ते 3 या वेळेत कोरोना नियमाचे पालन करून या दोन्ही प्रशालेत वाचन लेखनाचा उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने दिनांक  27 - 12 - 2021  पासून हा उपक्रम राबवित आहेत. दुसरीच्या शिक्षिका श्रीमती बनसोडे यांनी कृतीद्वारे वाचन, लेखनाचा उपक्रम घेत विद्यार्थ्यांमध्ये रममाण झालेले आहेत. तसेच वर्ग पाचवी नवोदय व शिष्यवृत्ती,  वर्ग आठवी शिष्यवृत्ती,  वर्ग दहावी जादा क्लास  घेऊन कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता  वाढविण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहेत  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन लटूरे, उपाध्यक्ष श्री सतीश कात्रे व सर्व सदस्य तसेच पालकांमधून शाळेतील उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला