घरकुल लाभार्थाना रेती उपलब्ध करा - वैभव घाटे
बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे काम केवळ रेती अभावी अडले आहे . रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नाही . आता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला. तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते. परिणामी तालुक्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते. तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु शासकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे घरकुल लाभार्थाना रेतीचा कण ही मिळालेला नाही शासकीय योजने अंतर्गत विहीत मुदतीत बांधकाम पुर्ण करण्याचा दंडक आसल्याने घरकुलाचे बांधकाम र...