सलगरा फाटा ते बेटमोगरा रस्त्याच्या कामाची तपासणी गुणनियंत्रण कक्ष औरंगाबाद मार्फत करण्यात यावी - भारत सोनकांबळे एक महिन्यापासून रस्त्याचे काम रखडले. मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली होती पण बेटमोगरा येथील नवतरुण युवा नेतृत्व करणारे व सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज, निवेदने देऊन संबधित प्रशासनाला धारेवर धरत या सलगरा फाटा ते बेटमोगरा हा रस्त्याचे काम चालू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या प्रयत्नाला यश जरी मिळाले असले तरीही गेली एक ते दीड महिना संपला या रस्त्याचे प्राथमिक स्वरूपाचे काम म्हणजेच खराब झालेला रस्ता जेसीबीच्या सहाय्याने रोड उखरले न उखरले त्या च्यावरच दबई करून थातूरमातूर स्वरूपाचे व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या मार्फत होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भारत सोनकांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेली महिनाभरापासून या रस्त्याच्या कामाला उतरती कळा लागली असून कामाची गती मंदावली असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप उफळून आल्याचे दिसून ...