बरबडा येथे नूतन वर्षाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी दिलीपराव धर्माधिकारी झंजावत दौरा करणार


            माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या नंतर नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भाजपा पक्षाचे दिलीपराव धर्माधिकारी यांच्यासह गावचे सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या उपस्थित आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येणाऱ्या काळातील निवडूणुकी संदर्भात एक जानेवारी २०२२ पासून भवानी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा परिषद गटात जेष्ठ नागरिकासह तरुण युवकाला सोबत घेऊन झंजावत दौरा करणार असल्याचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली आहे.तालुक्यातील मौजे बरबडा येथे कै.गोविंदराव  धर्माधिकारी यांनी बरबडा सर्कलचा मोठया प्रमाणात विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले व कै.दिगंबरराव धर्माधिकारी यांनी भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी घेऊन भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात व तालुक्या तालुक्यात  प्रयत्न केले त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीचे काम वाढविण्यासाठी तालुक्यात काम केले या दोघांचाही वारसा चालवण्यासाठी दिलीपराव धर्माधिकारी यांनी आशीर्वाद घेऊन पंचायत समितीच्या माध्यमातून छायाताई धर्माधिकारी यांनी विकास केला आहे






बरबडा हे गावाची लोकसंख्या अंदाजे बारा हाजार एवढी असून शिक्षणाच्या बाबतीत व शिक्षण क्षेत्रात बरबडा हे ग्रामीण भागात अतिशय अग्रेसर असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी  संख्या ही मोठया प्रमाणात असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा ही उंचावला असल्यामुळे या परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून बरबडा गावचा शिक्षणाचा दर्जा बरोबर सदर विकास डोळ्यासमोर ठेवून बरबडा ग्रामपंचायत कार्यालयात एक हत्ती सत्ता आणून विकास पर्व करण्याचा मानस असल्याचे भाजपाचे दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे बरबडा आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी सदर  दिलीपराव दिगंबरराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी  गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह युवकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी नूतन वर्षापासून बरबडा गटात मोर्चे बांधण्यासाठी व  झंजावत दौरा करणार असल्याचे दिलीप राव धर्माधिकाऱ्यासह व गावचे सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या कडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खात्री दायक माहिती मिळाली असल्यामुळे नक्कीच भाजपा पक्षा कडून दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे 

यावेळी ग्रामसभा संपल्याच्या नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन कारण्यात आले पत्रकार परिषदच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधवराव कोलगाणे होते तर उपसरपंच प्रतिनिधी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर,सदाशिव पाटील पचलिंग, सरपंच , माधव रेडेवाड, दिगंबर रुद्रवाड, व्यंकटी गिरे, बालाजी जंगीलवाड, बाबू इंद्रवाड, रामचंद्र कांबळे, बालाजी घोसलवाड, गंगाधर वन्ने, साईनाथ इरपे, नागनाथ वासमवाड, ज्ञानेश्वर सुरेवाड, देशोन्नतीचे पत्रकार किरण हांनमते, आनंदा काशीराम पोतनवार, राजीव रेगुडे,आदीसह ग्रामपंचायतचे कर्मचारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते व या पत्रकार परिषदेत दिलीपराव धर्माधिकारी जि प निवडणुकीसाठी पूर्व तयारी करून झंजावत दौरा करणार असल्याचे सांगितले आहे

Comments

Popular posts from this blog

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला