बरबडा येथे जवाहरलाल नेहरू विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे ७ जानेवारी रोजी आयोजन....
माधव पवार
नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नायगाव व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २९ वर्ष वय गटातील मुले व मुलींसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा,कबड्डी,स्पर्धा,खो खो व १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व कळावे आणि त्यांचे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळावे या मागचा उद्देश असून आजच्या पिढीला विद्यार्थी खेळापासून लांब राहत असल्यामुळे सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
तालुक्यातील बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व असल्याने खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाकडे आकर्षित झाला पाहिजे असे मत शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव धर्माधिकारी यांनी सांगितले असून या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघास प्रमाणपत्र व विजेत्या संघास स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे
बरबडा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नेहरू युवा केंद्र युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत तरी संपूर्ण नायगाव तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी, नेहरू युवा केंद्र नांदेडच्या जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर, उपमुख्याध्यापक बडूरे जी पी ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक शिंदे व्ही आर, सांस्कृतिक प्रमुख तिप्पलवाड एन टी यांनी केले असल्यामुळे तालुक्यातील स्पर्धकानी विशेष सहभाग घ्यावा असे संयोजकाने आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment