प्रशासनाच्या दरबारात आंदळ दळतय कुत्र पिठ खातोय
नायगाव पंचायत समितीच्या शासकीय जिपला २७ वर्षची जिप एक्सबार,जिल्हा परिषद अध्यक्षासह सिईओला वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा सभागृहात केले मागणी सौ सभापती प्रभावती कत्ते
माधव पवार
महाराष्ट्र शासनासह नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे "आंधळं दळतय " कुत्र पिठ खातोय " अशी गत निर्माण झाल्याचे सरळ सरळ दिसून येत असून गेल्या अनेक वर्षाखाली पंचायत सामीतीला शासकीय वाहन म्हणजे जिप देण्यात आली त्या वाहणाची मुदत ही संपून गाडी एक्सबार ? झाली असताना सुद्धा शासनाने नवीन वाहन देण्यासाठी चाल ढकल करत असल्यामुळे नायागांव पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना करून ही शासकीय नवीन जिप मिळत नसल्यामुळे प्रशासनाच्या दराबारी आंधळ्याची म्हण्याची वेळ येऊ लागली आहे नायागांव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण ८९ गावे असल्यामुळे सदर गावाचा कारभार पाहण्यासाठी शासकीय वाहनाची आवश्यकता असताना प्रशासन नवीन वाहन देण्यास टाळाटाळ करत असून गेल्या एक ते दीड वर्षात अनेक वेळा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ मंगारांनी यांच्यासह जिल्हा परिषदच्या मुखकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांच्या कडे लेखी पत्र व्यवहार नांदेड येथे घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण सभागृहात सुद्धा नायगाव पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांनी पंचायत समितीला नवीन वाहन अर्थात जिप देण्याची मागणी केली होती परंतु अध्याप शासनाने वाहन उपलब्ध करून दिले नाही असे सौ सभापती यांनी सांगितले आहे
महाराष्ट्र शासनाने राज्यात अनेक विभागाला नवीन वाहने उपलब्ध करून दिले पोलीस स्टेशन असो की शासकीय आरोग्य दवाखाने असो,तहसील कार्यालय असो तसेच अन्य विभागाला नवीन शासकीय वाहने मिळाली परंतु नायागांवच्या पंचायत समितीची शासकीय जिप एक्सबार होऊन सुद्धा नवीन वाहन मिळतं नसल्यामुळे प्रशासनाचा अजेब कारभार होत असल्याचा सरळ सरळ दिसून येत आहे उघड डोळ्यानी शासन पाहत असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सदर शासकीय वाहन एक्सबार झाली असताना ही ते वाहन शासकीय कामासाठी वापर करत असल्याचे दिसून येत असून सदरची जिप ही १९९३ ते ९४ मधील किल्लारी भूकंप भागात वापरलेली जिप ही नायगाव पंचायत सामीतीला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे नायागांव पंचायत समितीची शासकीय जिप एक्सबार ? झाली असताना ही आरटीओ विभागाचे दुर्लक्ष झाले की काय असा प्रश्न जनतेला पडला असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षासह सिईओनी सदर पंचायत समितीला शासकीय वाहन नूतन वर्षात तरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत व सदरचे वाहन सध्या पंचायत समितीकडे असल्यामुळे ते जिल्हा परिषदकडे जमा करून घ्यावेत अशी मागणी सौ सभापती प्रभावती कत्ते यांनी नूतन वर्षात तरी नायगावच्या पंचायत समितीला शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावेत असे नूतन वर्षाच्या पूर्व संध्येला मागणी करत नूतन वर्षाच्या सर्व जनतेला शुभेच्छा ही सभापतीने दिल्या आहेत
नायगाव पंचायत समितीला मिळालेली शासकीय जिपची अंदाजे बारा वर्षा पासून मुदत संपून सुद्धा ते वाहन वापरात असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा किती गलथान कारभार असू शकतो या पेक्षा दुसरा पुरावा कोणता असू शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी येथे १९९३ मोठा भूकंप झाला होता त्यावेळी नायगाव पंचायत समितीची जिप तेथे शासकीय कामासाठी वापरात होती प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातील तालुक्याला दिल्या त्यात नायागांव, धर्माबाद, मुदखेड,उमरी अशा तालुक्याला दिल्या होत्या परंतु नायगाव पंचायत समितीला २००४ मध्ये देण्यात आली असलेल्या शासकीय जिप एम एच २५ .६१०१ या क्रमांकाची गाडी एक्सबार झाली असताना ही वापरत कशी असा प्रश्न जनतेतुन विचारला जात असल्यामुळे तत्काळ या जिपला शासनाकडे जमा करावेत अशी मागणी जोर धरीत आहे
Comments
Post a Comment