Posts

युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने  ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप . कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे नायगाव तालुक्यातील देगाव येथील गोर गरीब शेतमजूरी करणार्‍यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले असून अशरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत  त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टी युवा नेते राहुल दादा गायकवाड यांच्या वतीने तालुक्यातील मौजे देगाव येथील गरजूंना  अन्न धान्याची  मदत करण्यात आली.या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष,मंगेश गायकवाड, सचिन, राजू    सर्व मित्र परिवार व कार्यकरते उपस्थित होते...

जिल्ह्यात उज्वला योजनेतील २ लाख लाभार्थ्यांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर

Image
लॉकडाऊन काळात उज्वला योजनेंतर्गत जोडण्या घेतलेल्या लाभार्थ्यांना दिलासा - नितीन आमले नांदेड प्रतिनिधी/ वैभव घाटे कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान उज्वला योजनेंतर्गत गॅस घेतलेल्या ग्राहकांना भारत सरकारने माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत गॅस रिफिल देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दोन लाख उज्वला योजनेंतर्गत जोडणी घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना मोफत गॅस पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नांदेड जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियमचे नांदेड जिल्हा सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली आहे.देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा गॅस मोफत मिळा...

रोगराई टाळण्यासाठी बेटमोगरा ग्राम पंचायत च्या वतीने गावभर केली जांतूनाशेक फवारणी.

Image
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे  तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालय च्या माध्यमातून गावचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, ग्रामसेवक श्री.स्वामी व ग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांच्या मार्फत गावातील रोगराई टाळण्यासाठी तिन पावर स्प्रेव्दारे औषधीची फवारणी सोमवार (ता.३०) रोजी केली असल्याचे सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील यांनी माहिती दिली आहे.   मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तसेच रोगराई टाळण्यासाठी गाव स्वच्छ ठेवा रोगराई पळवा हे ब्रिद वाक्य घेऊन बेटमोगरा येथे ग्राम पंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून गावात रोगराईला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी गावचे सरपंच सौ पद्मजा खुशालराव पाटील यांनी पुढाकार घेत पावर स्प्रे पंपा व्दारे सोडियम हायपोक्लाराईडची (पावडर) फवारणी केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय यांच्या या उपक्रमाचे बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. चिनू पाटील,शिवाजी माधवराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबाई सोनकांबळे,कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत...

बेटमोगरा येथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जन्मोत्सव निमित्त अभिवादन.

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे   मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्मशील बुद्धविहार येथे अशोका जन्मोत्सव २०२० राष्ट्रीय पर्व अशोकाष्टमी चैत्र शुक्ल अष्टमी १ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजता प्रियदर्शी  राजा सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला रमाई  फाऊंडेशन चे सचिव भारत सोनकांबळे व ग्रा.पं. सदस्या लालीताबई सोनकांबळे,याच्या हस्ते दीप्रज्वलन करुन,पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भारत सोनकांबळे यांनी राजा सम्राट अशोक यांच्या कार्याला उजाळा देत ते म्हणाले, केवळ तलवारीच्या जोरावर सिंकंदरने जग जिंकले पण जिंकण्याच्या मोहात त्याला जनतेचे प्रेम मात्र मिळाले नाही. परंतु या पृथ्वीतलावर एक असाही सम्राट होऊन गेला ज्याने तलवारी ऐवजी,न्यायाच्या, प्रेमाच्या,विश्वासाच्या जोरावर जग जिंकले. काबूल पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून मद्रास पर्यंत ज्याच्या साम्राज्याच्या सीमा पसरल्या होत्या आणि नेपाळ,चीन,मंगोलिया इराण,इजिप्त,श्रीलंका आणि पूर्व आणि मध्य आशियात ज्याच्यामुळे भगवान बुद्धांच्या धम्मराज्याचा विस्तार झाला होता तो म्हण...

बेटमोगरा येथील नाथ गोसाई भिक्षुकाना धान्य वाटप.

Image
मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्भूमीवर हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब जनतेला धान्य पुरवठा संदर्भात तालुक्याचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने बेटमोगरा येथे धान्य वाटप करण्यात आले. ‘कोरोना विषाणू' संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे, असे लोक उपाशी राहू नये, म्हणून मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कार्यकर्त्यांना आदेशित केले होते त्यांच्या आदेशाचे पालन करून तालुक्यातील बेटमोगरा गावातील युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार स...

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ वाऱ्यावर पत्रकारांसाठी आर्थिक तरतूद हवी - तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड :- वैभव घाटे

Image
 सद्यसथितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात करोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू या महाबीमारी ने धुमाकूळ माजवला असताना या बिकट परिस्थितीत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून वार्तांकन करून सर्व सामान्य माणसाच्या व देशाच्या हितासाठी  आपले कुटुंब व संसार बाजूला ठेवून जनजागृती साठी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपली भूमिका अहोरात्र पार पाडत असून त्यांना कोणताच आर्थिक आधार नसल्याने वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार ने भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून  या बाबत जनतेच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार प्रशासन च्या माध्यमातून उपाययोजना करत असले तरी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे राज्यातील पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला घरी राहण्याबाबत जनजागृती करत आ...

मुखेड तालुक्यात भव्य पशु शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला जन्म दिवस

Image
सामाजिक उपक्रमातून साजरे करावेत जन्मदिवस -       डॉ.राहुल कांबळे मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे मुखेड तालुक्यातील होडगीड वाडी दारू तांडा सोनपेठ वाडी फतु तांडा येथील पशुपालकां साठी गोवर्धन गो सेवा केंद्र परिसरात भव्य पशुरोग निदान शिबिर तर धर्माबाद तालुक्यात गरोदर मातास पोष्टीक आहार देऊण साजरा केला डॉक्टर राहुल कांबळे येवतीकर यांच्या आपला जन्म दिवस त्यानिमित्त आयोजित करण्यात आले सकाळपासून गेचुड फवारणी जंतनाशक गर्भ तपासणी शंभर जनावरावर मोफत विलाज करण्यात आलेला आहे. तर धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील आरोग्य विभागाचे उपकेंद्र वर कार्यरीत असलेल्या डॉ.राहुल कांबळे यांच्या सौभाग्यवती आरोग्य सेविका सौ.सोनाली वाघमारे यांनी आपल्या उपकेंद्रावर गरोदर मातास पोष्टीक आहार देऊन आपल्या कार्यसम्राट समाज सुधारक पतीला सामाजिक उपक्रमातून  दिलेल्या शुभेच्छा. मुखेड तालुक्यातील डॉक्टर राहुल कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते पण त्यांच्या समाजातील  दि.15 /03/2020 रोजी परिवारातील सदस्य मुखेड न्यायालयाती वकील गोरोबा कांबळे यांचा अपघाती न...