Posts

हाडाच्या कारखान्यामुळे परिसरात दुर्गधी बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे बिलोली शहरातील कोंडलापुर मार्गावरील हाडाच्या कारखान्यात जनावाराची हांडे महाराष्ट्र व तेंलगणा राज्यातुन आयात करुन त्या हाडावर प्रकिया करुन त्या हाडांचे पावडर  दुसऱ्या राज्यामध्ये विक्री साठी नेतात कारखान्याच्या परिसरात दुर्गधी येत आसुन परिसरातील नागरिकांना यांचा मोठा मनस्ताप होत आहे बिलोली शहरापासुन दोन कि मी अंतरावर हा  कारखाना आहे  कोंडलापुर नाग्यापुर  सुलतानपुर ग्रामपंचायत हाद्दीतील हा मला मोठा कारखाना उभा करण्यात आला तेंलगणा राज्यातुन दररोज दोन ते तिन ट्रक जनावाराचे हाडे बिलोली शहारातुन कारखान्यात नेले जातात  शहरातुन जात आसताना मोठ्या प्रमाणात दुर्गधी पसरली जात आहे या कडे संबंधित प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थपुर्ण संबधामुळे गप्प आहे   अशा कारखान्यावर जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ जातीने लक्ष घालुन अशा कारखान्याना महाराष्ट् शासन प्रदुषण  मंडळाची परवानगी देवु नये अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे

मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली

 बिलोली  प्रतिनिधी   ( वैभव घाटे ) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे राष्ट्रसंत डाँक्टर शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे वयाच्या 104 वर्ष 1 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले आज दिं 14 सप्टेंबर 2020 रोजी मारोती मंदीर परिसरा सामोर सर्व गावकर्याच्या वतीन शोकसभा आयोजीत करुन श्रध्दांजली वाहीण्यात आली या प्रसंगी शिवभक्त भिमराव पाटील बावलगावकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता  किर्तनकार भिमराव पाटील रामराव पाटील माणिकराव पाटील यांच्या हास्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करुन आदरांणजली वाहीण्यात आली यावेळी रामराव पाटील माणिकराव पाटील हाणमंतराव पाटील मारोती पाटील गोविद पाटील शिवराज पाटील विश्वनाथ महाराज शिवकुमार मोठे नागनाथ पाटील बसवंत पाटील इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती अन्नदान करुन सर्व गावकरी मंडळी च्या वतिन महाराज श्रध्दांजली वाहीण्यात आली शासनाने दिलेल्या सुचनेचा काटेकोर पणे पालन करुन शोकसभा संपन्न झाली

फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची वसुली थाबवण्याची इंद्रजीत डुमणे गागलेगावकर याची मागणी नांदेड प्रतिनिधी -

Image
 कोरोना व्हायरसने जगात धुमाकुळ घातलेला आहे दिवसें दिवस रुग्नाची संख्या वाढत चालली आसताना  .तसेच मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 17 मे पर्यंत  लाॅकडाउन घोषीत केलेला आहे . संचार बंदी लागु असतानां सुध्दा मायक्रो फायनांन्स कंपनीचे कर्मचारी गावो गावी फीरत आहेत  लोकांच्या हाताला कामे नाहीत कसेतरी आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा परिस्थितीत लोक कसे मायक्रो फायनांन्सचे  पैसे भरतील विनाकारण लोकांना ञास देण्याचा प्रयत्न या कंपनीकडुन केल्या जात आहे.तेव्हा प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवुन लाॅकडाऊनच्या काळात या मायक्रो फायनांन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना गावो गावी फीरु देवु नये   फायनांन्स आणी मायक्रो फायनांन्स यांची  वसुली पुढील पुढील तिन महीणे थांबवण्यात यावी अशी,मागाणी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित डुमने यांनी केली आहे .

बिलोली येथील रक्तदान शिबिरात 66 जणांनी केले रक्तदान

Image
 बिलोली प्रतिनिधी  (वैभव घाटे)  शहरातीलच पंचायत समिती येथे  यूद्ध कोरोणाशी ग्रुप बिलोली व तालूका प्रशासन यांच्या  संयूक्त विद्यमानाने जीवन आधार रक्तपेढी नांदेड मार्फत रक्तदान शिबिर दि 4 एप्रिल रोजी संपन्न झाले असून 66 रक्तदात्यानी रक्तादान केले. भारतात कोरोना विषाणू ने भारतात घातलेला थैमान लक्षात घेऊन भारत सरकारने केलेल्या आव्हानाला स्विकारुन कोरोना ग्रस्थांना रक्ताचा पुरवटा करण्यासाठी युद्ध कोरोनाशी ग्रुप व बिलोली तालूका प्रशासन कडून अव्हान करण्यात आले होते.  शिबिरात शहर व तालूक्यातील गणेश मंडळाचे सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी ,सह महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणचे सगरोळी येथील मारोती पा.कुरुडगे यांच्या  कुटुंबातील 12 सदस्य व  श्रुती एच पि गँसचे कर्मचारी सह अनेकजन सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी बिलोली प्रशासनाचे तहसिलदार विक्रम राजपुत व नायब तहसिलदार ओम प्रकाश गोंड ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नायक ,यूद्ध कोरोनाचे प्रमुख इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदि...

धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,

Image
हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित  दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात  कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे  लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी  उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे  गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म...

युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

Image
मुखेड प्रतिनिधी - भारत सोनकांबळे युवानेते राहुल गायकवाड यांच्या वतीने  ५०० ते ६०० गरजू लोकांना अन्न धान्य वाटप . कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक म्हणून महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे नायगाव तालुक्यातील देगाव येथील गोर गरीब शेतमजूरी करणार्‍यांच्या कुटुंबावर भिषण संकट आले असून अशरश: त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत  त्यांना मदतीचा हात म्हणून प्रजासत्ताक पार्टी युवा नेते राहुल दादा गायकवाड यांच्या वतीने तालुक्यातील मौजे देगाव येथील गरजूंना  अन्न धान्याची  मदत करण्यात आली.या वेळी राहुल गायकवाड, सुभाष गायकवाड, अंकुश देगावकर, संभाजी गायकवाड, संदीप कांबळे, गोविंद हते,किशोर मोरे, नितीन रोडे ,मोशीन शेख, सोनू शेख, मुबिन शेख,अविनाश गायकवाड, राम जिगळेकर,संभाजी मोरे, अजीज शेख, उत्तम पवार,अमोल, संतोष,मंगेश गायकवाड, सचिन, राजू    सर्व मित्र परिवार व कार्यकरते उपस्थित होते...

जिल्ह्यात उज्वला योजनेतील २ लाख लाभार्थ्यांना आजपासून मिळणार मोफत गॅस सिलेंडर

Image
लॉकडाऊन काळात उज्वला योजनेंतर्गत जोडण्या घेतलेल्या लाभार्थ्यांना दिलासा - नितीन आमले नांदेड प्रतिनिधी/ वैभव घाटे कोविड १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान उज्वला योजनेंतर्गत गॅस घेतलेल्या ग्राहकांना भारत सरकारने माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत मोफत गॅस रिफिल देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील दोन लाख उज्वला योजनेंतर्गत जोडणी घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना मोफत गॅस पुरवठा करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नांदेड जिल्ह्यातील दोन लाख लाभार्थ्यांना आजपासून मोफत गॅसचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती भारत पेट्रोलियमचे नांदेड जिल्हा सेल्स मॅनेजर नितीन आम्ले यांनी दिली आहे.देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारा गॅस मोफत मिळा...