Posts

लोकमत चे जेष्ठ पत्रकार बस्वराज वाघमारे काळाच्या पडद्याआड

Image
  बिलोली टाईम्स न्युज :- नागेश इबितवार    बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार बस्वराज वाघमारे यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वाघमारे यांना बिलोलीहून नांदेड येथे उपचाराकरिता घेऊन जात असतांना कासराळी जवळ त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने पत्रकार बांधवांमध्ये हळहळ व्यक्त करित आहे. अतिशय मनमिळावू असे व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.   त्यांच्या अचानक निघून जाण्याने वाघमारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. बिलोली तालुक्यातील सर्व पत्रकार व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक १९ ऑगस्ट सायंकाळी बोळेगाव येथील त्यांच्या राहत्या गावी ठिक ०५: ०० वाजता करण्यात येईल,असे सांगण्यात आले.

बिरमोड यांना पीएच.डी. प्रदान बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार

Image
  बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार कुंडलवाडी शहरातील रहिवाशी मिलिंद प्राथमिक व विद्यालय शाळेचे माजी विद्यार्थी रमेश पंढरीनाथ बिरमोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर ने अभियांत्रिकी शाखेतील सर्वोच्च विद्यावाचस्पती म्हणजेच पीएच.डी. पदवी नुकतच बहाल करण्यात आली आहे ध्या नागपूर विद्यापीठातील लक्ष्मीनारायण इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजी येथे रसायन अभियांत्रीकी विभागात कार्यरत असलेले प्रा. रमेश बिरमोड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिवर्सीटी लोणेरी,रायगड येथून बी.टेक. तर आय.आय.टी. मुंबई येथून एम.टेक. पूर्ण करून एल.आय.टी. नागपूर येथे  प्राध्यापक म्हणून रुजू होऊन मार्गदर्शक डॉ. श्रींकात दवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली " मॉडलिंग सिमूलेशन एंड एक्सपेरीमेंटल स्टडी ऑफ मेंबरेन डिस्टीलेशन "या विषयावर संशोधन करून ९ प्रकारचे मेंबरेन बनवून आरोग्यदायी पिण्यालायक पाण्याचे शुध्दीकरण करण्याचे नवे तंत्र ही संशोधीत केले या त्यांच्या यशाबद्दल मिलिंद प्राथमिक व विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मित्र  परिवारआणि कुंडलवाडी शहरात सर्व स्तरातून कौतूक होत आहेत.

राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृह बांधकामासाठी पंचवीस (२५.००) लक्ष निधी मंजुर करा*

Image
* पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांना  दिले निवेदन* नांदेड प्रतिनिधी  / नागेश इबितवार   देगलुर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावे सभागृह व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून शहरातील परिट/धोबी समाज बांधवांनी संबंधितांना निवेदन, विनंती करित आसतांना स्व.आमदार रावसाहेब आंतापुरकर साहेब यांनी स्थानिक विकास निधीतून ७.००लक्ष रू निधी उपलब्ध करून देऊन,  संघटनेच्या विनंतीचा सन्मान केल्याने नुकतच आदरणीय आमदार अमरनाथजी राजुरकर साहेब यांच्या हस्ते भायेगाव रोड परिसरात भुमीपुजन करण्यात आले, परंतु ६६/६६  चौ.फु.जागेमध्ये, उपलब्ध करून दिलेल्या निधितुन राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृहाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित नाही.तरी नामदार पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आमच्या निवेदनाचा साहानुभुतीपुर्वक विचार करून अंदाजित २५.०० लक्ष रुपये   निधी मंजुर करून द्यावे.आसे देगलूर शहरात धोबी समाज खुप मोठ्या प्रमाणात असल्याने येथिल समाज बांधवांच्या वतीने आदरणीय साहेबांकडे निवेदन सादर करण्यात आ...

बिलोली तालुक्यात उज्वला योजनेचा उडाला फज्जा ग्रामिण भागात पुन्हा पेटल्या चुली! बिलोली/नागेश इबितवार

Image
  बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार   तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.ग्रामिण भागात उज्वला योजनेत  गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच आता एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूल'च बरी म्हणत चूल पेटायला लागल्या आहेगेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर चे भाव गगनाला भीडत आहे. या वाढत्या गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून,काही भागात मिळत असलेल्या फुकट चे धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा भागवणे चालू झाले आहे. गेल्या काही दिवसामध् हाताला काम, मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिता लागली असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.

75 व्या स्वातंत्र्यदिनी अंजनी येथे शेतकरी प्रकल्प संपन्न बिलोली - नागेश इबितवार

Image
बिलोली प्रतिनिधी  - नागेश इबितवार    15 ऑगस्ट 2021 रोजी मौ. अंजनी येथे कृषी महाविद्यालय नायगाव (बा.) अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य मार्गदर्शक हर्षद दिगंबर पाटील (पारवेकर) यांनी माती परीक्षण,शेणखत  गांडूळ खत तसेच सेंद्रिय शेती यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय  शेती कशा पद्धतीने करावी याचे मोलाचे मार्गदर्शन केले दिवसेंदिवस आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त शेतामध्ये रासायनिक औषधांचा वापर करणे होय यामुळे माती वर होणारे परिणाम उत्पन्नात होणारी घट याचे  मुख्य कारण होय तसेच माती परीक्षण ही एक काळाची गरज आहे हे जाणून शेतकऱ्यांनी माती परीक्षण केंद्र मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करून घ्यावे यामुळे मातीचा PH (सामू) तसेच सेंद्रिय कर्ब याची पुरेपूर माहिती आपल्याला मिळेल व त्या पद्धतीने मातीला लागणारी पोषक तत्त्व आपण सेंद्रिय पद्धतीने देऊ शकतो. तसेच शेती हा एक पूरक व्यवसाय आहे यामध्ये आपण विविध प्रकारचे योजना आखून शेळी पालन ,मत्स्य पालन, शेततळे इ.  यापासून भरपूर प्रमा...

मौजे गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांना ४००० रुपयांची लाच स्वीकारतांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ अटक

Image
बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे   मौजे गागलेगाव ता.बिलोली जि.नांदेड येथील तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांना ४००० रुपयांची लाच स्वीकारतांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ पकडण्यात आले. दिनांक २४/५/२०२१ रोजी त क्रारदार यांनी तक्रार दिली की तक्रारदार अध्यक्ष असलेले श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट मौजे गागलेगाव करिता दान पत्राद्वारे प्राप्त झालेली जमिनीची नोंद ७/१२ ला घेण्यासाठी दिनांक १८/५/२०२१ रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी करून दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले व उर्वरित पाच हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत तक्रारदार यांचे तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड कार्यालयाकडून दिनांक २५/५/2021 रोजी पंचांसमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये तलाठी विजयकुमार कुलकर्णी यांनी तक्रारदार यांचे उपरोक्त कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दिनांक २७/५/२०२१ रोजी तहसील कार्यालय बिलोली चे प्रांगण परिसरात लावण्यात आलेल्या सापळ्या दरम्यान तलाठी कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडून उपरोक्त कामासाठी ...

सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना ! बिलोली - वैभव घाटे

Image
 सिलिंडरच्या दरवाढीनंतर आता सबसिडीही मिळेना ! बिलोली - वैभव घाटे गँस सिलेंडर च्या दरवाठी मुळे सामान्य कुटुंबा आर्थिक संकटात सापडला आहे ग्रामिण भागात गँस सिंलेडर  शोभेची वस्तू बनवुन राहात आहेत  गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय ? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे . अगोदरच मोलमजुरी करून गॅस आणावा लागायचा . आता तो गॅस महाग झाल्याने सिलिंडर शोभेची वस्तू होते की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे . ' गेल्या दोन - तीन वर्षापासून सबसिडीच्या स्वरूपात स्वयंपाक गॅस मिळत होता . पण सहा महिन्यापासून सिलेंडरचे दर वाढत चालले आहेत याउलट सबसिडी जमा होणे ही वर्षापासून बंद झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींची मोठी अडचण झाली आहे  अशी स्थिती असताना गॅसची भाववाढ सातत्याने होत चालली आहे . परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे . या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे . पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनान...