कुंडलवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण यांना अवैध व्यवसायाचे आव्हान
बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क - नागेश इबितवार विषेश पोलिस महानिरीक्षक निसार ताबोळी यांच्या आदेशाने येथील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे यांची बदली परभणी जिल्हात झाल्याने येथील पोलिस ठाण्याचे पदभार कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांना देण्यात आले व ते कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारले परंतू ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पाय पसरले आहेत. शहर व परिसरात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्यात पठाण यांना यश मिळेल का ? पठाण यांनी अवैध धंदेवाल्यांचे आव्हान स्वीकारून ते बंद करतील का याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागून आहे. अवैध वाळू तस्करी,आदीसह सर्वच अवैध धंदे पोलिसांचा आशीवार्दाने चालतात स्वतः धंदा चालवणारे आम्ही पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांना हप्ता देवून परवानगी घेवून धंदा चालतो असे बोलून दाखवतात.तरी असे अवैध धंदे व धंदेवाले पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात पाय पसरविले. यामुळे अनेक तरूण पिढी व्यसनाधीन होवून आपले जीवन गमविले आहेत. व व्यसनाधीन होत चालेले तर अनेक नागरिक कर्जबाजारी होवून त्यांचे संसार उघड्यावर आले व येत आहेत.नाईलाजाने...