केरूर येथिल सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने लाखो रुपये निधीच्या कामात भ्रष्टाचार तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा मानवहित लोकशाही पक्षाची मागणी
बिलोली- साहेबराव दावलेकर
तालुक्यांतील केरुर येथिल सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने सन २०१७ ते २०२१-२२ या वर्षातील चौदावा वित्त आयोग व पंधरावा वित्त आयोग निधीत व शौचालयात लाखो रुपयेचा भ्रष्टाचार झालेला असुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आहे तालुक्यातील केरुर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमतेणे निधीच्या कामात लाखो रुपये चा भ्रष्टाचार करून परस्पर लाखो रुपये हडप केलेले असुन व सरपंचपदी निवड झाल्यापासून ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात आली नाही,मौ. केरुर येथील सरपंच व ग्रामसेवकाच्या संगनमताने चौदावा वित्त आयोग निधीच्या कामात भ्रष्टाचार करून परस्पर लाखो रुपये हडप केलेले असुन तसेच घरकुल , मनरेगा,व शौचालय व पाणीपुरवठासह विविध कामांत भ्रष्टाचार झालेला आहे सन. २०१६ ते २०२१ दरम्यान चौदावा वित्त आयोग निधीतील पाणीपुरवठा , एलईडी बल्ब खरेदी, अंगणवाडी, शौचालयसह दलित वस्ती विविध कामांत मोठा भ्रष्टाचार केला आहे या कामाची सखोल चौकशी करुन दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात नमुद करून निवेदन मानव हित लोकशाही पक्षाचे तालुकाध्यक्ष मां. विजय भरान्डे व मानवहित लोकशाही पक्ष कामगार आघाडी तालुकाध्यक्ष बिलोली मां मोहन गायकवाड. व हानमंत दावलेकर. मदूकर कुडके यांच्या स्वाक्षरी चे निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे सदर प्रकारची चौकशी करून गुन्हे दाखल न केल्यास दि.१०/१/२०२२रोजी पंचायत समिती कार्यालय समोर अमरण उपोषण करण्याचा ईशारा शासनाला दिला आहे
Comments
Post a Comment